मुख्यमंत्री ग्राम सडक व हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करा – मंत्री हसन मुश्रीफमुख्यमंत्री ग्राम सडक व हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करा – मंत्री हसन मुश्रीफ

Spread the news

मुख्यमंत्री ग्राम सडक व हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करा – मंत्री हसन मुश्रीफ

­

 

कोल्हापूर दि : 23 (जिमाका) जिल्हयात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गंत कागल,गडहिंग्लज व उत्तूर येथील तसेच हॅम योजनेतंर्गंत कागल तालुक्यात सुरू असलेली कामे येत्या जानेवारी अखेर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालीच पाहिजेत असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
कागल,उत्तुर तसेच गडहिंग्लज या गावांच्या रस्ते व इतर प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात मंत्री मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध आढावा बैठकींचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, एकनाथ काळबांडे,तहसीलदार अमरदीप वाकडे,कागल न.प.चे मुख्याधिकारी अजय पाटणकर, क्रांतीकुमार मिरजकर,युवराज पाटील,भैय्या माने आदी उपस्थित होते .
मुश्रीफ पुढे म्हणाले ,कागल येथील रि .स नंबर 426 येथे राहणाऱ्या नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्डबाबत प्रशासनाने योग्य तो समन्वय साधून मानवीय दृष्टिकोनातून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा.तत्पूर्वी रि .स नंबर 426 येथील 42 गुंठे धारकांना वगळून उर्वरित जागेचा वेगळा 7 / 12 उतारा करण्यात यावा.तसेच ही जमीन वर्ग एकची करण्यात यावी अशी मागणी तेथील स्थानिक रहिवाशांनी केली . यावर जिल्हा प्रशासनाने योग्य तो अभ्यास करून हा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मकता दर्शवली.यावेळी श्री मुश्रीफ यांनी, २०११पूर्वीचे शासकीय जागेवरील अतिक्रमीत बांधकाम नियमित करणे योजनेअंतर्गत ग्रामपंचायत सिध्दनेर्लीयेथील वाढीव गावठाण / गायरान लाभार्थी प्रस्ताव तसेच
गडहिंग्लज येथील नवीन क्रीडांगण अर्थात एम.आर. हायस्कुलच्या नवीन क्रीडांगणाची जागा ही जिल्हा परिषद अधिपत्याखालील असल्याने सदरची जागा जिल्हा परिषदच्या नावे होण्याबाबतही सविस्तर आढावा घेतला. या आढावा बैठकीसाठी उपअभियंता सी .ए पाटील, बी.ए पुजारी, एम.पी. पाटील यांच्यासह संबंधित कंत्राटदार तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
00000

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!