माळी समाजाचे पुरस्कार जाहीर
तुकाराम माळी यांना जीवनगौरव तर गजानन माळी यांना समाजभूषण पुरस्कार
समाजाचा 13 डिसेंबरला मेळावा
कोल्हापूर
लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेचा वधू-वर पालक मेळावा तसेच पुरस्कार वितरण समारंभ रविवार दि. 13 डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी दहा वाजता राजारामपुरी येथील कै. व्ही. टी. पाटील सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, यंदाचा जीवन गौरव पुरस्कार निवृत्त शिक्षक तुकाराम नायकु माळी यांना तर समाजभूषण पुरस्कार येळगुड लिंगायत माळी समाजाचे अध्यक्ष गजानन माळी यांना जाहीर करण्यात आला आहे.
लिंगायत माळी समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शिल्पा खोत, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबईतील उद्योगपती शंकरराव बोरकर हे भूषवणार आहेत.
या कार्यक्रमास जयसिंगपूर चे नगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, माळी समाज पुणे संघटनेचे अध्यक्ष कृष्णात अडसूळ, गोकुळचे संचालक अजित नरके, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर, माजी महापौर विजयराव धुळुबुळू, कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण केसरकर, उद्योजक सुरेश इरळे, सुरज साखरे, मनोहर माळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी जीवनगौरव आणि समाजभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.



