*डॉ. सुनीलकुमार लवटे ग्रंथालयातर्फे ‘ओळख संविधानाची’ उपक्रमाचे आयोजन*🌸
मानवत : जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय, मानवत रोड येथील डॉ. सुनीलकुमार लवटे ग्रंथालयाच्या वतीने भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर रोजी ‘*ओळख संविधानाची’* या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना भारतीय *संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता* या मूलभूत मूल्यांची ओळख करून देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य *डी.के गडगिळे सर* होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागप्रमुख *रामजी तळेकर सर* व विनोद लांमतुरे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशन विभागप्रमुख *अर्जुन भिसे सर* यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण होणे आणि संवैधानिक मूल्यांची रुजवण होणे किती आवश्यक आहे, हे अधोरेखित केले.
यानंतर *विनोद लांमतुरे सर* यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील *स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले*. संविधान म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनात संविधानाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे प्रत्यक्ष पुस्तक दाखवून त्याची रचना, स्वरूप व वैशिष्ट्यांची ओळख करून देण्यात आली. प्राचार्य *डी.के.गडगिळे सर व रामजी तळेकर सर* यांनीही संविधानाचे स्वरूप, त्याची आवश्यकता आणि दैनंदिन जीवनातील महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे *रीडर्स ग्रुपच्या*सदस्यांनी डॉ. सुनीलकुमार लवटे ग्रंथालयास भारतीय संविधान भेट म्हणून दिले* विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती जोपासण्यासोबतच संविधानाविषयी आस्था आणि जाणीव निर्माण करण्याचा हा स्तुत्य उपक्रम ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी *विद्यार्थ्यांनी संविधान दिना निमित एक संवाद नाटिका सादर केली.*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *सविता कोटकर मॅडम* यांनी केले, तर *उमेश पडघन सर* यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
संविधानाची प्रत्यक्ष ओळख, संवैधानिक मूल्यांची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची प्रेरणा देणारा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸



