सी – टीईटी परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्र देण्याची मागणी मान्य :राज्याध्यक्ष भरत रसाळे
कोल्हापूर .भारत सरकारच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सी -टीईटी (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ) घेण्यात येते . सन 2026 मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्र देण्याची मागणी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्ली यांनी मान्य करून डिसेंबर 2026 मध्ये होणाऱ्या सी .टीईटी परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्र देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांनी दिलेली आहे .
समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , सीटीईटी परीक्षेसाठी या पूर्वी महाराष्ट्रात फक्त मुंबई , संभाजी नगर , अमरावती नागपूर या ठिकाणीच केंद्रे होती . मागील वेळी कोल्हापुर जिल्हा व परिसरांतील सेवेतील शिक्षक व नवीन विद्यार्थी अशा सुमारे चाळीस हजार परीक्षार्थीना मुंबई केंद्र मिळाले होते .त्यामुळे त्यांच्या निवासाची , प्रवासाची व केंद्र ठिकाण शोधण्यांसाठी खूप त्रास झाला होता त्यामुळे आमच्या महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने 3जून 26 रोजी केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ नवी दिल्ली येथील सी .टीईटी परीक्षा विभागाच्या संचालकांना निवेदन देऊन पश्चिम महाराष्ट्रासाठी एकही केंद्र नसल्याने कोल्हापूर सांगली, सातारा , सोलापूर ,रत्नागिरी , सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी सीटीईटी परीक्षेसाठी सोयीचे ठिकाण म्हणून कोल्हापूर केंद्र द्यावे अशी मागणी केलेली होती . व ही मागणी मान्य होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा परीक्षा संचालकांचेकडे चालू होता .या प्रयलांना यश येऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सी.टीईटी परीक्षा विभागाने सहानुभूतीपूर्वक विचार करून कोल्हापूर केंद्रास मान्यता दिलेली आहे . या परीक्षा केंद्रामुळे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 40 हजाराहून अधिक
परीक्षांर्थीना प्रवास , निवास व्यवस्था याच्या कटकटीतून मुक्त होऊन सोयीच्या ठिकाणी परीक्षा देण्यांसाठी दिलासा मिळाला आहे . 1 2डिसेंबर 2026 पासून सुरू होणाऱ्या सी -टीईटी परीक्षेसाठी कोल्हापूर हे केंद्र मिळाल्यांने परीक्षार्थीच्यामध्ये समाधान पसरल्याचे महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी सांगितले आहे . कोल्हापूर केंद्र दिल्याबद्दल संघटनेच्यावतीने केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ दिल्ली यांचे आभारही त्यांनी मानले आहेत .
. ………



