ऑस्ट्रेलियामधील जागतिक परिषदेत* *श्रीराम राजूरकर यांना सर्वोत्तम प्रकाशन पुरस्कार*

Spread the news

*ऑस्ट्रेलियामधील जागतिक परिषदेत*
*श्रीराम राजूरकर यांना सर्वोत्तम प्रकाशन पुरस्कार*
कोल्हापूर : –
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील, सहाय्यक प्राध्यापक श्रीराम राजूरकर यांना एडलेड (ऑस्ट्रेलिया) येथे झालेल्या वर्ल्ड काँग्रेस २०२५ मध्ये सर्वोत्तम प्रकाशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

­

 

सेंटर फॉर इंटरडिस्प्प्लेनरी स्टडिज विभागातील वैद्यकीय भौतिकशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक असलेल्या श्रीराम राजूरकर यांना त्यांच्या पीएच.डी. संशोधनासाठी प्रोफेसर सुंग सिल चू बेस्ट स्टुडंट पब्लिकेशन अवॉर्ड २०२५ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासोबत त्यांना 400 डॉलर्सचे रोख पारितोषिकही मिळाले. हा पुरस्कार वैद्यकीय भौतिकशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो.हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ दुसरे भारतीय वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत.या साठी त्यांना प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

  •  

या जागतिक परिषदेत दोन मौखिक सादरीकरणे सादर केली, ज्यातून भारताच्या संशोधन क्षमतेचे दर्शन घडले. या परिषदेस १२० हून अधिक देशांतील १००० पेक्षा अधिक प्रतिनिधींनी सहभागी झाले होते.
या परिषदेसाठी राजूरकर यांना भारत सरकारच्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनकडून या आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी अनुदानही प्राप्त झाले.

या पुरस्काबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. सी. डी. लोखंडे यांनी अभिनंदन केले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!