* खाजगी शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांना 1 जुलैची जादा वेतनवाढ मंजूर : भरत रसाळे
* कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय
* कोल्हापूर :मुंबई हायकोर्ट च्या कोल्हापुर सर्किट बेंचने मागील वेतनवाढीनंतर सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या 260 शिक्षकांना पुढील 1 जुलैची वेतन देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली आहे .
राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिलेल्या निवेदनांत म्हटले आहे की , 31 डिसें ते 31 मे या कालावधी दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या वतीने भरत रसाळे व इतर अशा 260 सेवानिवृत शिक्षकांनी पुढील 1जुलैची वेतनवाढ मिळावी म्हणून मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये याचिका क्र . 2248/2026 ची याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल गुरवार दि 25 जून रोजी याचिकाकर्त्यांच्या बाजूने लागला असून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथ/माध्य शाळांतील शिक्षक व उपशिक्षणाधिकारी ,गटशिक्षणां धिकारी अशा 260 जणांना या वेतनवाढीचा फरकासह लाभ मिळणार आहे .
अँड रक्षलेखा निकम यांनी या प्रकरणी काम पाहिले असून या बाबतची सुनावणी न्यायमूती मिलिंद जाधव व न्याय .नंदेश देशपांडे यांच्या पुढे होऊन त्यांनी मुख्यकार्य कारी अधिकारी सो यांनी संबंधित याचिकाकर्त्याचे सेवानिवृती वेतन 1 जुलैच्या एका ज्यादा वेतनवाढीसह सुधारित करून ते फरकासह दोन महिन्याच्या आत अदा करावे असा आदेश दिला आहे . . मान न्यायमूर्ती महोदयांनी अतिशय उत्कृष्ठ निकाल देऊन या शिक्षकांना न्याय दिल्याने सेवानिवृत शिक्षकांच्यात समाधान पसरल्याची माहिती शिक्षक नेते भरत रसाळे यांनी दिली आहे .




