- *जगप्रसिद्ध फॉक्सकॉन कंपनीमध्येमध्ये महिलांसाठी करिअर सुवर्णसंधी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे प्लेसमेंट ड्राईव्ह*
कोल्हापूर : आय-फोन उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या फॉक्सकॉन कंपनीमध्ये महिलांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि पीएसएन सप्लाय चेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ही भरती मोहीम आयोजित करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांसाठी 17 जुलै आणि 18 जुलै 2026 रोजी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बंगळुरू येथील उत्पादन प्रकल्पात काम करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीकडून दरमहा ₹18,256 वेतन, पीएफ , ईएसआयसी व विमा, उपस्थिती बोनस ₹750, ओव्हरटाईम ₹140 प्रति तास, मोफत भोजन , प्रीमियम हॉस्टेलमध्ये मोफत निवास, तसेच मोफत पिक-अप व ड्रॉप सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय वार्षिक वेतनवाढ, शिफ्ट अलाउन्स आणि सुरक्षित व आधुनिक कामाचे वातावरणही देण्यात येणार आहे. भरतीसाठी 18 ते 30 वर्षे वयोगटातील महिला उमेदवार पात्र असून 10 वी, 12 वी, डिप्लोमा किंवा पदवीधर शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे तर शनिवार दिनांक 18 जुलै रोजी श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, विवेकानंद कॉलनी, इचलकरंजी येथे सकाळी 9.30 वाजल्यापासून पुढे प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न होईल. सर्व पात्र महिला उमेदवारांनी वरील सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा , असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केले आहे. संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी ड्राईव्हचे नियोजन केले असून अधिक माहितीसाठी ड्राईव्हच्या समन्वयक पी. एस. खाडे यांच्याशी 99602 46449 या क्रमांकावर संपर्क साधावा.




