सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अजिंक्य.

Spread the news

सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अजिंक्य.

कोल्हापूर – संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी करून 233 गुणांसह एकूण सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. दुसऱ्या क्रमांकावर नेव्ही चिल्ड्रेन स्कूल, गोवा (113 गुण) तर तिसऱ्या क्रमांकावर न्यू होरायझन पब्लिक स्कूल, ऐरोली, नवी मुंबई (94 गुण) राहिले. बक्षीस समारंभ कार्यक्रमासाठी संजय घोडावत विद्यापीठाचे रजिस्टर डॉ. विवेक कायंदे, संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती, बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच एम नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली हे उपस्थित होते. यावेळी बोलताना सस्मिता मोहंती म्हणाल्या, या स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांक खेळाडूचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या राज्याचे व शाळेचे नाव मोठे करावे. खेळाकडे एक करिअर म्हणून पहावे.”

वैयक्तिक विजेते खालीलप्रमाणे :
गट 14 वर्षाखालील मुले : वरदराज जगताप (एसपीएम पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे), सर्वेश पाटील (विबग्योर हाय, उचगाव, कोल्हापूर)
गट 14 वर्षाखालील मुली : ध्रुविका पवार (अग्रसेन विद्या मंदिर, औरंगाबाद), प्रांजल थोरात (केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, पुणे)
गट 17 वर्षाखालील मुले : मोहम्मद अरशद (आर्मी पब्लिक स्कूल, दिघी कॅम्प, पुणे), कौशिक चौधरी (दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान, नागपूर)
गट 17 वर्षाखालील मुली : अश्वी ताकळे (एसपीएम पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे), वैदेही सुद्रिक (एसएसपीएम श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, मुंबई)
गट 19 वर्षाखालील मुले : अवनीश गोड्डे (ए.एस.एमएस एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल, पुणे), सुमित कुमार बेहरा (आर्मी स्कूल, कुलाबा, मुंबई), सिद्धार्थ गरांडे (पोदार इंटरनॅशनल स्कूल, सांगली)
गट 19 वर्षाखालील मुली : निधी काळे (भवन्स बी.पी. विद्या मंदिर, वाठोदा, नागपूर), रिफात रहमान (शांतिनिकेतन मोरेवाडी, कोल्हापूर), वंदना ठाकूर (जिंदाल विद्या मंदिर, ठाणे)
या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोव्यातील नामांकित सीबीएसई शाळामधील 1217 खेळाडूंनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून अनेक विक्रम प्रस्थापित केले. विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरण समारंभात सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले. विजयी खेळाडूंचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!