ताराबाई पार्कमध्ये विनापरवाना वृक्षतोड; दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी

Spread the news

ताराबाई पार्कमध्ये विनापरवाना वृक्षतोड; दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी

­

 

कोल्हापूर : शहरातील ताराबाई पार्क परिसरात चंद्रवाणी हॉल समोरील एका बंगल्या आवारात दिनांक ५ फेब्रुवारी रोजी विनापरवाना झाडांची तोड करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उज्ज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

  •  

या संदर्भात महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना निवेदन देण्यात आले. महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने या प्रकरणी नोटीस बजावली असली तरी इतक्या गंभीर पर्यावरणीय गुन्ह्यात केवळ नोटीस देणे ही अपुरी कारवाई असून दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदर वृक्षतोड ही Maharashtra (Urban Areas) Protection and Preservation of Trees Act, 1975 या कायद्याचे स्पष्ट उल्लंघन असून महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतेही झाड तोडणे बेकायदेशीर आहे. तसेच या प्रकरणात Environment Protection Act, 1986 अंतर्गतही कारवाई होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी व भविष्यात शहरात विनापरवाना वृक्षतोड होऊ नये यासाठी महानगरपालिकेने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी गणेश लाड, अजित पाटील, सागर टिपूकडे, सुनील सामंत, अभिजीत कदम, प्रसाद पवार, संजय चव्हाण, यशवंत शेळके आदी उपस्थित होते.

सदर बातमी आपण आपल्या वृत्तपत्र तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसिद्ध करून सहकार्य करावे, ही नम्र विनंती.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!