खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शून्य टक्के व्याजदराने ई-बाईक चे वितरण*

Spread the news

* *खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शून्य टक्के व्याजदराने ई-बाईक चे वितरण*

 

 

  •  

*कोल्हापूर-*
*कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने शून्य टक्के व्याज दराने सभासदांच्या साठी ई बाईक वितरण समारंभ बजाज चेतक पार्वती टॉकीज जवळ येथे संपन्न झाला यावेळी बोलताना चेअरमन मच्छिंद्र नाळे म्हणाले की संस्थेचे संस्थापक आदरणीय भरत रसाळे सर यांच्या दूरदृष्टी आणि मार्गदर्शनाखाली पतसंस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि काटेकोरपणे चालविला जात आहे*
*तसेच दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पतसंस्थेच्या वतीने सभासद शिक्षकांसाठी विशेषत: शून्य टक्के व्याजदराने ई-बाईक वितरण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र सभासदांना आज ई-बाईकचे वितरण करण्यात आले.*
*या वेळी बोलताना चेअरमन मच्छिंद्र नाळे यांनी सांगितले की, “वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार ही योजना सुरु करण्यात आली असून, सभासदांच्या हितासाठी संस्था सदैव तत्पर आहे.संस्थेच्या या उपक्रमामुळे शिक्षक सभासदांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळाला असून, पर्यावरणपूरक आणि आधुनिकतेचा विचार करून ई-बाईकसारखा पर्याय निवडण्यात आला आहे.*
*हा उपक्रम संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असून, भविष्यातही अशा अनेक उपयुक्त योजना राबवण्याचा संस्थेचा मानस आहे. या वितरण समारंभप्रसंगी बजाज चेतक चे सर्वेसर्वा खासलीवाल साहेब, व्हॉइस चेअरमन कृष्णात चौगले, यावेळी संस्थेचे संचालक सर्वस्वी सूर्यकांत बरगे ,सर्जेराव नाईक, शिवाजी सोनाळकर ,वसंत पाटील, महादेव डावरे ,अमित परीट सल्लागार समिती सदस्य संभाजी सुतार, सभासद सर्वस्वी कृष्णात कुंभार ,सौ रेखा गुरव, विजय सातपुते कार्यकारी संचालक सदाशिव साळवी उपस्थित होते.*

*कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर*


Spread the news

You may also like

error: Content is protected !!