एकमुखी दत्त देवस्थान कोल्हापूर, श्री एकमुखी दत्त आखाडा सेवाभावी संस्था गेले 9 वर्ष पासून महाचंडी यज्ञ, महिलांकरिता भव्य कुंकू, देवीच्या काळ्या पाषाणाच्या मूर्तीला स्वतःच्या हाताने अभषेक, पूजा अर्चना करण्याची भावकांना मळावी या उद्देशाने श्री एकमुखी दत्त देवस्थान कोल्हापूर, श्री एकमुखी दत्त आखाडा सेवाभावी संस्था यांनी मठाधपती श्री संतोष गरी गोसावी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 9 वर्ष महाचंडी यज्ञ चे आयोजन करण्यात येत आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र उत्सव सुरुवात दिनांक 22 सप्टेंबर 2025 सोमवार समाप्ती दिनांक 1 ऑक्टोबर 2025 बुधवार रोजी होणार असून याकरिता मठाधपती श्री संतोष गरी गोसावी महाराज यांनी दिनांक 20/7/2025 रोजी माननीय श्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री रस्ते परिवहन यांची नागपूर येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छाभेट घेतली. महाचंडी यज्ञ करिता आमंत्रण केले. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाचंडी यज्ञास उपस्थित राहतो असे आश्वासन दिलेले आहे