सदाभाऊ खोत यांचा जाहीर निषेध

Spread the news

सदाभाऊ खोत यांचा जाहीर निषेध
अॅड अनिल घाटगे जंतर मंतर या ठिकाणी असणारे विद्यार्थी हे आतंकवादी आहेत व देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र, शिक्षणात धर्मेंद्र, अशी मुक्ताफळे उधळणारे एकेकाळचे शेतकरी नेते सदाभाऊ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकेकाळचे धडाडीचे कार्यकर्ते यांना राजू शेट्टी यांनी भाजप सरकार मध्ये मंत्री केले. लाल दिव्याच्या गाडीच्या मोहापाई एनडीए मधून बाहेर पडण्यास नकार दिला आणि शेतकरी नेते ते भाजपचे वाजंत्री असा प्रवास सुरू झाला. शेतकरी नेते म्हणून आक्रमक भाषण करणारे सदाभाऊ खोत भाजपच्या कृपेने सध्या आमदार आहेत आमदारकी टिकवायची झाली तर लाचारी स्वीकारावीच लागेल एकेकाळी आंदोलन करणारे आज विद्यार्थ्यांना बाकी आतंकवादी म्हणत आहेत मग आपण आंदोलन करत होता त्यावेळेला कोण होता…….? हे ते सध्या सोयीस्करित्या विसरले आहेत. देश विनाशेच्या उंबरठ्यावर उभा असताना सदसद विवेक बुद्धीला स्मरून सरकारला थोडे खडे बोल सुनावने गरजेचे असताना भाजपची तळी उचलणे म्हणजेच स्वतःची बुद्धी गहाण टाकणे होय. एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पोट तिडकीने बोलणारे आणि हजारो लोकांची मने जिंकणार्या भाऊंचे सध्या जहाज भरकटले आहे ते निश्चित रत्नागिरीच्या….. किनाऱ्या पर्यंत जाईल. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होता येत नसेल तर किमान गप्प तरी बसावे एवढे सुद्धा कळत नाही याचे आश्चर्य वाटते.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!