थकबाकीदार व्यवसायिक मिळकती सील करा, इतर मिळकतींवर बोजा नोंद करा – आयुक्त के.मंजूलक्ष्मी

Spread the news

थकबाकीदार व्यवसायिक मिळकती सील कराइतर मिळकतींवर बोजा नोंद करा  आयुक्त के.मंजूलक्ष्मी

­

 

नगररचनाघरफाळापाणीपुरवठाइस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा घेतला आढावा

  •  

कोल्हापूर, ता. 9 : महानगरपालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा आज आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला. ही बैठक दुपारी आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी सर्व संबंधित विभागांनी उर्वरीत कालावधीत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, थकबाकी असलेल्या व्यवसायीक मिळकती सील कराव्यात  तसेच इतर मिळकतींवर बोजा नोंद करण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.

            नगररचना विभागाने आजअखेर ८२ कोटी रुपयांची वसुली केली असून उर्वरित २८ कोटी रुपये मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना उपशहर रचनाकारांना देण्यात आल्या. त्यासाठी विशेष वसुली कॅम्प आयोजित करण्याचे निर्देशही देण्यात आले. नगररचना विभागातील प्रत्येक अभियंत्याने त्यांना देण्यात आलेले वसुलीचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असून उद्दिष्ट पूर्ण न केल्यास संबंधितांची इतर विभागात बदली करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला. त्यामुळे सर्व अभियंत्यांनी ३० मार्चपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश देण्यात आले.

            घरफाळा विभागाचे १११ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून आजअखेर ५८ कोटी ८० लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित कालावधीत थकीत तसेच नव्याने आढळणाऱ्या मिळकतींचा शोध घेऊन वसुली वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. थकबाकी असलेल्या व्यावसायिक मिळकती सील करणे, इतर मिळकतींवर बोजा नोंद करणे तसेच थकबाकीदारांशी थेट संपर्क साधून वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले.

            पाणीपुरवठा विभागाने मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करून त्यांचा पाणीपुरवठा खंडित करावा, असेही आयुक्तांनी निर्देश दिले. पाणीपुरवठा व इस्टेट विभागाची वसुली कमी झाल्याचे निदर्शनास येत असून थकबाकीदारांचे दुकान गाळे सील करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

            यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, सहा-आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार एन एस पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, पाणी पट्टी अधिक्षक प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य अग्शिनशमन अधिकारी मनिष रणभिसे व नगररचना विभागाकडील सर्व अभियंता उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!