गोकुळची प्रगती ही दूध उत्पादकांच्या सहकार्यानेच
– नामदार हसन मुश्रीफसो
वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री
गोकुळ दूध संघाची गडहिंग्लज तालुका संपर्क सभा संपन्न …
कोल्हापूर, ता.२३ : कोल्हा पूर जिल्हान सहकारी दूध उत्पाेदक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी संलग्न गडहिंग्लज तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा शनिवार दि.२३/०८/२०२५ इ.रोजी सूर्या मंगल कार्यालय, गडहिंग्लज येथे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्याा अध्यक्षतेखाली व माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळ व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की, गडहिंग्लज तालुक्यातून गोकुळला होणाऱ्या दूध पुरवठ्यामध्ये म्हैशीचे दूध ५४ % तर गाईचे दूध ४६ % आहे, ही बाब अभिमानास्पद असून तालुक्यातील सर्व दूध उत्पादकांचे हार्दिक अभिनंदन केले. गोकुळची प्रगती ही दूध उत्पादकांच्या सहकार्यानेच झाली असून गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या चार वर्षांत म्हैशीच्या दुधाला १२ रुपये व गाईच्या दुधाला ६ रुपये अशी महत्त्वपूर्ण दरवाढ करण्यात आली आहे. बाजारपेठेत गोकुळच्या म्हैशीच्या दुधाला मोठी मागणी असून, यामुळे संघाची खरी ओळख ही म्हैशीच्या दुधामुळेच आहे.
गोकुळच्या दूध उत्पादन वाढीसाठी त्यांनी जातिवंत म्हैशी खरेदी करण्याचे आवाहन केले. तसेच,“लाडका सुपरवायझर योजना” राबवून फक्त दोन महिन्यांत जवळपास एक लाख जातिवंत म्हैशी खरेदी करण्याचा संकल्प घेण्यात आला असून, सुपरवायझरांनी यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. साहेबांनी पुढे नमूद केले की, वासाचे दूध, दुय्यम प्रत दूध आणि पशुखाद्याचा दर्जा यांचे वैज्ञानिक पद्धतीने निराकरण करणे ही संचालक मंडळाची जबाबदारी आहे.
“गोकुळच्या दुधाला मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, मात्र पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे दूध उत्पादन वाढविणे हे काळाचे महत्त्वाचे आव्हान आहे. सर्व दूध उत्पादकांनी सहकार्य करून या प्रयत्नात सहभागी होणे आवश्यक आहे, तरच गोकुळचा ब्रँड देशात नंबर एक करण्याचे स्वप्न पूर्ण होईल,” असे नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गडहिंग्लज तालुक्यामध्ये दुग्ध व्यवसायमध्ये युवकांचे प्रमाण समाधानकारक असून अजून अधिकाधिक तरुणांनी या दुग्ध व्यवसायाकडे गोकुळच्या सेवा सुविधांचा लाभ घेऊन या क्षेत्रात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाचे अभिनंदन ठरावाने करण्यात आले. तसेच किसान विमा पॉलिसीअंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत जनावरांच्या मालकांना विमा धनादेशांचे वाटपही करण्यात आले. यावेळी दूध संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती सविस्त्र चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्याख प्रश्नां चे निरसन करण्यावत आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.
यावेळी संघाचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांनी सभेस मार्गदर्शन केले. स्वागत व प्रस्ताविक संचालिका श्रीमती अंजना रेडेकर तर आभार संचालक रणजितसिंह पाटील यांनी मानले.
या प्रसंगी याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठर संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी तसेच गडहिंग्लज तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन,संचालक,प्रतिनिधी,दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
————————————————————————————————-
फोटो ओळ – याप्रसंगी मार्गदर्शन करताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ् संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर आदी दिसत आहेत.
————————————————————————————————-