सर्वच शासकीय विभागांत गेल्या 2 ते 3 वर्षापासून ठेकेदारांनी केलेल्या विकास कामांना मिळत असलेल्या अपुऱ्या निधी मुळे आंदोलन छेडण्या संदर्भात…
आपणा सर्वांनाच ज्ञात आहेच कि गेल्या 2-3 वर्षापासून सर्वच शासकीय विभागांत ठेकेदारांनी केलेल्या सर्वच लेखाशिर्षांतर्गत विकास कामांची देयके अपुऱ्या निधी अभावी थकीत असून त्यामुळे सर्व ठेकेदार वर्ग हा मोठ्या आर्थिक तसेच मानसिक संकटात सापडलेला आहे. संदर्भित कारणास्तव ठेकेदारांच्या अनेक संघटनांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून, आंदोलने करून शासन दरबारी व्यथा मांडलेली आहे.परंतु शासना मार्फत कोणत्याही प्रकारची सदर बाबी वर दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे सर्व सामान्य ठेकेदारांची अवस्था दिवसागणिक बिकट होत चालली असून काही ठेकेदारांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचललेले आहे. काही जण मानसिक आजारांना सामोरे जात आहेत.
संपूर्ण राज्यात प्रलंबित असणाऱ्या ठेकेदारांच्या बिलांच्या रकमा मोठा प्रमाणाबाहेर आहे.
सदर आकडेवारी हि मार्च २०२६ अखेरीस प्रलंबित असणाऱ्या देयकांची आहेत. या बाबत अनेक वेळा आंदोलने करून पत्रव्यवहार करून देखील प्रशासन व शासन संघटनांच्या प्रतिनिधीना चर्चेसाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासंदर्भात वेळ देत नाही.
त्यामुळे यावर शासनाच्या अनास्थे बाबत आवाज उठविण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे जिल्ह्यातील आज शासनाकडून ठेकेदारांस सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास दिनांक १५/०४/२०२६ नंतर सर्व ठेकेदारांनी सर्व प्रगतीतील विकास कामे बंद करण्याचे पाऊल उचलावे लागले असे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. तसेच नवीन कोणत्याही निविदा भरण्याचा नाहीत. नविन निविदेवर बहिष्कार टाकण्यात येणारआहे. अत्यंत महत्त्वाचे तातडीचे कामे १५ एप्रिल २०२६ पर्यंत संपवण्याचे व पुढे कुणालाही प्रकाराचे काम चालू ठेवण्याचे नाहीत असा निर्णय घेतला आहे. आजच्या आंदोलन साठी महाराष्ट्र राज्य हॉट मिक्स संघटनेचे अध्यक्ष माननीय बाबा गुंजाटे साहेब यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया याचे महाराष्ट्र संचालक कृष्णाणि साहेब यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. सदर ठिय्या आंदोलन हे दिवसेंदिवस तीव्र होत जाणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारने याच्यावरती लवकरात लवकर मार्ग नाही काढला तरी आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल. संबंधित निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधी,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, तसेच सर्व डिपार्टमेंटचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेले आहे.
निवेदन देताना कोल्हापूर जिल्हा गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष किशोर जामदार उपाध्यक्ष सोहम दळवी संदीप सावंत खजिनदार किरण माळी सचिव निलेश पाटील व संचालक मंडळातील प्रशांत शेलार,दयानंद शिंदे,आनंद पवार,प्रदीप पाटील,दिलीप पाटील,बाळासो तुरंबे,दिग्विजय गायकवाड, प्रणव पाटील,आप्पासो मोहिते,मधुकर कुंभार,तानाजी शेंडगे,नारायण दळवी,उत्तम पाटील,दीपक जाधव, स्वप्निल लाड,विश्वजीत देसाई,मोहन पाटील,महादेव एकल, सतिश मोहिते,सर्जेराव देसाई,ओंकार पाटील मंगेश शिंदे,युवराज चौगुले अविनाश कुपटे,दिग्विजय निकम,महेंद्र कलकुटगी,शक्ती शिंदे,विशाल पाटील, सतीश मोहिते तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व डिपार्टमेंटचे ठेकेदार उपस्थित होते




