*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेला रु.3 कोटी 65 लाखाचा नफा :* *चेअरमन साप्ताप्पा कासार यांची माहिती

Spread the news

*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेला रु.3 कोटी 65 लाखाचा नफा :*
*चेअरमन साप्ताप्पा कासार यांची माहिती*

­

 

*कोल्हापूर:- चालू आर्थिक वर्षात खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सह.पतसंस्थेस 3 कोटी 65 लाख रु इतका नफा झाला असून सभासदांना या वर्षापासून पंच्चावन्न लाख रु इतकी कर्जमर्यादा केल्याची घोषणा कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन साताप्पा कासार यांनी केली.ते पतसंस्थेच्या 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. श्रीराम सोसायटी हॉल कसबा बावडा येथे ही सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाली. संस्थापक व तज्ञ संचालक श्री भरत रसाळे यांच्या हस्ते जलार्पण करून सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत या सभेची सुरवात झाली.*
*अध्यक्षपदावरून बोलताना चेअरमन सातापा कासार म्हणाले की सभासदांच्या साठी एकूण कर्ज मर्यादा 55 लाख करीत आहोत. चालू वर्षी आपल्या संस्थेस विक्रम रुपये 3 ,65,79,337/-इतका विक्रमी नफा झाला. त्यातून सभासदांना 15 टक्के लाभांश व भेट म्हणून शेअर भांडवलावर 30 टक्के रक्कम अशी एकूण 45% सभासद भेट मिळणार आहे त्याचबरोबर सभासदांना दिवाळी भेटही दिली जाणार आहे . संस्थेची वार्षिक उलाढाल 650 कोटीवर असून संस्थेकडील ठेवी 112 कोटीच्या पुढे आहेत . उत्तरोत्तर संस्था अशीच प्रगती करत राहणार अशी ग्वाही त्यांनी दिली.*
*या सभेत पतसंस्थेचे संस्थापक व तज्ञ संचालक श्री भरत रसाळे यांनी लाभांश व कायम ठेवीवरील व्याज तात्काळ सभासदांच्या सेव्हिंग खात्यावर जमा केले जाणार असून संस्थेने स्विकारलेल्या सहकार खात्याच्या नवीन उपविधी नुसार सभासदांनी आपले सर्व व्यवहार चोख ठेवावेत असे आवाहन केले.*
*यावेळी चर्चेत संचालक राजेंद्र कोरे, शिवाजी सोनाळकर यांच्यासह सभासद सर्वस्वी सागर पाटील, टी आर पाटील, कुमार पाटील, दत्तात्रय पाटील, संतोष केसरकर यांनी सहभाग घेतला.*
*नोटीस वाचन सचिव वसंत पाटील यांनी केले प्रोसिडिंग वाचन व्यवस्थापक सदाशिव साळवी यांनी केले.सूत्रसंचालन सौ. विद्या पाटील यांनी केले तर आभार व्हा. चेअरमनअमित परीट यांनी मानले.*
*यावेळी संचालक सर्वस्वी मच्छिंद्र नाळे, कृष्णात चौगले, सर्जेराव नाईक, सौ. माधुरी घाटगे ,राजेश कोंडेकर, महादेव डावरे, रोहिणी येडगे, संतोष आयरे सल्लागार समिती सदस्य आप्पासो वागरे, पंडित मस्कर ,चंद्रकांत वाकरेकर, दशरथ कांबळे , संस्थेचे कर्मचारी यांच्यासह सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.*

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!