करवीर निवासिनी आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवताना कोणावरही अन्याय होणार नाही

Spread the news

करवीर निवासिनी आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली.
आराखड्यातील बाधित व्यापारी आणि रहिवास्यांची सराफी व्यापारी संघ सभागृहात बैठक संपन्न.
यावेळी बाधित व्यापारी आणि नागरिकांनी,अंबाबाईच्या आशीर्वादानेच आम्ही येथे पिढ्यानपिढ्या राहतोय, व्यवसाय करतो. त्यामुळे आम्हाला देवीच्या कामात खोडा घालायचा नाही, अंबाबाई विकास आराखड्याला विरोध करायचा नाही, अडथळा, आंदोलन करायचे नाही.
जे कोणी विरोध करत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही नाही, असा ‘शब्द’ देत योग्य पुनर्वसन, योग्य मोबदला हीच आमची मागणी आहे. ती तेवढी मान्य करा, अशी अपेक्षा व्यक्त केली, यावर करवीर निवासिनी आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली.
अंबाबाई कॉरिडॉरसाठीच्या भूसंपादनात कमीत कमी नागरिक बाधित होतील, यासाठी नवे पर्याय काढू. व्यापारी-रहिवाश्यांनी घाबरू नये. ३० मीटरऐवजी १० मीटर परिसराचे संपादन झाले, तर ६०० कोटी रुपये वाचतील. बाधितांची संख्या कमी होईल. याबाबत लवकरच तीर्थक्षेत्र विकास समितीच्या बैठकीत निर्णय घेऊ, असे सांगितले.
यावेळी भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव,महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक किरण नकाते,सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, हेमंत आराध्ये, जयंत गोयाणी यांच्यासह व्यापारी बांधव आणि नागरीक उपस्थित होते.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!