Spread the news

  •  

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने 9 ते 13 जुलै दरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने 9 ते 13 जुलै दरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये सर्व गटात मिळून 326 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेसाठी “महादेवरावजी रामचंद्र महाडीक फाउंडेशन” प्रायोजक म्हणून लाभले आहेत.

सन 1970 मध्ये स्थापन झालेल्या कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनने 2020 मध्ये पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे कोणत्याही स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. पन्नास वर्षांपूर्वी श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे, श्रीमंत हिम्मतसिंह घाटगे, श्रीमंत विक्रमसिंह घाटगे, बाबा भोसले, मेजर पी वाय सोहोनी, सरदार मोमीन यांनी बॅडमिंटन असोसिएशनची स्थापना केली. या काळात त्यांना मुंबईचे नारायणदास रुपारेल, सुशीलकुमार रुईया, पुण्याचे अण्णासाहेब आणि दाजीसाहेब नातू यांनी मोलाची साथ दिली आणि कोल्हापुरात बॅडमिंटन खेळ रुजवला. त्याकाळी फक्त अलंकार हॉल आणि कपिलतीर्थ मंडईमध्येच बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध होती.

असोसिएशनच्या स्थापनेनंतर कोल्हापुरात सातत्याने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक स्पर्धा झाल्या. प्रकाश पदुकोण यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत कोल्हापुरात खेळ केला आहे.

स्थानिक खेळाडू इकबाल मैंदरगी, सुरेश नाडगोंडे, वर्षा नाडगोंडे, सरोज रासम, वैशाली आगाशे, प्रेरणा आळवेकर, ऋचा आळवेकर यांच्यासह मयूर तावडे विनोद भोसले असे अनेक नामवंत खेळाडू असोसिएशनने दिले. शिवाय सुरेखा सरदेसाई, डॉ. रवी पाटील, डॉ. रमेश देसाई, अरुण चिटणीस, दिलीप चिटणीस, माणिकताई देवधर, अभिमन्यू भणगे, निनाद कामत, केदार नाडगोंडे, तन्मय करमरकर जान्हवी कानिटकर, राहुल काणे, पौरस कुलकर्णी या खेळाडूंनीही राज्य व राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा गाजवल्या आहेत.

कोल्हापुरात खेळलेल्या खेळाडूंपैकी शोभा मूर्ती यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते तर मयूर तावडे शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन बॅडमिंटन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात खेळाडू मोठ्या संख्येने तयार होत आहेत. कोल्हापूर विविध मार्गाने देशातील अनेक शहरांशी जोडले जात आहे. त्यामुळे भविष्यात येथे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू येऊ शकतात. याचा फायदा स्थानिक खेळाडूंना होऊन यातूनच उद्याचे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू तयार होऊ शकतात.

गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे सुवर्णमहोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी श्रीकांत वाड यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अनेक नवोदित खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी त्यांना या ज्येष्ठ खेळाडूंकडून अनेक मार्गदर्शनपर टिप्स मिळाल्या. यावेळी कोल्हापुरातील जुने, अनुभवी खेळाडूही उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या काळातील स्पर्धा आणि खेळांविषयीच्या आठवणी उपस्थितांशी शेअर केल्या.

गेल्या वर्षभरात दोन खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचं नाव उज्वल केलं. रुतिका कांबळे या खेळाडूने नोव्हेंबर 24 मध्ये जयपूर येथे झालेल्या 15 वर्षांखालील मुलींच्या डबल्स मध्ये भारतात प्रथम क्रमांक पटकावला. प्रेरणा आळवेकर या खेळाडूने मलेशियातील क्वालालांपुर येथे झालेल्या “सुपर सिरीज 500” या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. कोल्हापुरातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू तयार होत आहेत, याचंच हे द्योतक आहे.

या पत्रकार परिषदेवेळी असोसिएशनचे प्रेसिडेंट, उद्योगपती सतीश घाटगे, व्हाईस चेअरमन विनोद भोसले, ट्रेझरर चंद्रशेखर सोवनी, सेक्रेटरी तन्मय करमरकर व पदाधिकारी उपस्थित होते..

बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये सर्व गटात मिळून 326 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेसाठी “महादेवरावजी रामचंद्र महाडीक फाउंडेशन” प्रायोजक म्हणून लाभले आहेत.

You may also like

error: Content is protected !!