कोल्हापूरच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात कोल्हापूर फर्स्टकडून अमित शाह यांना कृतज्ञता-मानपत्र : दीर्घकालीन विकासासाठी महत्त्वपूर्ण निवेदन

Spread the news

📰 कोल्हापूरच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात
कोल्हापूर फर्स्टकडून अमित शाह यांना कृतज्ञता-मानपत्र : दीर्घकालीन विकासासाठी महत्त्वपूर्ण निवेदन

­

 

कोल्हापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शहा यांची सर्किट हाऊस येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील ज्यांनी मा. अमित भाई शाह यांचा कोल्हापूर दौरा नियोजित केला त्यांचा पुढाकाराने कोल्हापूर फर्स्टच्या शिष्टमंडळाची भेट.
यावेळी त्यांना कृतज्ञता-मानपत्र तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या दीर्घकालीन विकासासंदर्भातील निवेदन सादर करण्यात आले.
मानपत्रात श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वैभवाचे प्रतीक असल्याचा उल्लेख करण्यात आला. मंदिर विकासासाठी मंजूर झालेल्या निधीमुळे कोल्हापूरच्या पर्यटन, धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच कोल्हापूरच्या जनतेप्रती दाखविलेल्या आत्मीयतेबद्दल अमित शाह यांचे विशेष आभार मानण्यात आले.
यावेळी बोलताना कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी आपल्या कोल्हापूर प्रति आत्मीयता व विकास करता आग्रहा मुळे कोल्हापूरच्या दीर्घकालीन विकासाच्या ऐतिहासिक पर्वाची सुरुवात होत असल्याचे सांगून विशेष आभार मानले. तसेच कोल्हापूरच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासासाठी तयार करण्यात आलेले विशेष निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनामध्ये केंद्र सरकारकडे कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे प्रकल्पाला गती देणे, ईएसआय मेडिकल कॉलेज सुरू करणे आणि ‘खेलो इंडिया’ योजनेंतर्गत आधुनिक क्रीडा संकुल उभारणे यांसारख्या महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या. तसेच कोल्हापूर – सांगली – सातारा – कोकण या पट्ट्यासाठी ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प राबविण्याची मागणी करण्यात आली. यामुळे वाहतूक, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे नमूद करण्यात आले.
राज्य शासनाकडे कोल्हापूर – सांगली – सातारा परिसराला फाउंड्री, इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून विकसित करण्याची तसेच कोल्हापूर – सांगली- इचलकरंजी त्रिशहरी क्षेत्राचा एकात्मिक विकास करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली.
‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेत कोल्हापूरचे योगदान अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने समन्वयाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या शिष्टमंडळात कोल्हापूर फर्स्टचे सचिव बाबासो कोंडेकर, केईए अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, मॅक अध्यक्ष मोहन कुशिरे, संचालक हरिश्चंद्र धोत्रे, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानबाग, सहसचिव जयदीप पाटील, खजिनदार पद्मसिंह पाटील, नितीन वाडीकर तसेच पीआरओ जितेंद्र बामणे उपस्थित होते.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!