म्हैस दूध वाढीचा निर्धार गोकुळ लवकरच २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल असा विश्वास! -नविद मुश्रीफ चेअरमन गोकुळ दुध संघ

Spread the news

 

 

  •  

 

 

म्हैस दूध वाढीचा निर्धार गोकुळ लवकरच २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल असा विश्वास!

-नविद मुश्रीफ

चेअरमन गोकुळ दुध संघ

 

कोल्हापूर ता.२७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) वतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. गोकुळच्या या दूध संकलन वाढ मोहिमेला गती देण्याच्या दृष्टीने गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी श्री हसन मुश्रीफ दूध संस्था कागल या संस्थेच्या व कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या२० म्हैशी हरियाणा येथून आणल्या आहेत .

यावेळी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळ हा दूध उत्पादकांचा संघ आहे या भावनेतून सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेत आहोत. गोकुळ दूध संघाचे सरासरी १७ ते १८ लाख लिटर प्रतिदिन संकलन आहे .तो २५ लाख लिटरपर्यंत नेण्याचा स्पष्ट संकल्प गोकुळने केला असून, त्यात ६०% दूध म्हशीचे असावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांना परराज्यातून जातिवंत म्हैस खरेदी करण्यासाठी ५०हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अण्णासाहेब पाटील महामंडळ व इतर महामंडळाच्या माध्यमातून म्हैस खरेदीच्या बिनव्याजी योजना आणलेल्याच आहेत. प्रत्येक दूध उत्पादकाने किमान एक म्हैस जरी खरेदी केली तर कोल्हापूर जिल्ह्यातून म्हैसीचे २० लाखांहून अधिक लिटर दूध संकलन वाढेल.केडीसीसी बँकेनेही म्हैस खरेदीसाठी शेतकऱ्याला दहा हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी गोकुळ दूध संघाच्यावतीने बँकेकडे करणार आहोत. दूध संकलन वाढवण्याच्या दृष्टीने गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष या नात्याने मी स्वतःच २० म्हैसी खरेदी केल्या आहेत. सर्व संचालक, अधिकारी, कामगार आणि दूध उत्पादक शेतकरी हीरीरीने यामध्ये सहभागी असून आत्ता अधिक जोमाने या दूध संकलन वाढ मोहिमेमध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली .

५४ जनावरांचा गोठा…….

गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या शेतातील गोठ्यामध्ये या आधीच्या मुरा जातीच्या दहा म्हशी व दोन रेडे आहेत. आज त्यांनी हरियाणा राज्यातील जिंद व रोहतक जिल्ह्यांमधून नवीन २० म्हशी आणल्या. तसेच; लहान २२ रेडकांमध्ये १३ रेडे व नऊ रेड्या आहेत. एकूण ५४ संख्या असलेल्या या सर्व म्हशी, रेडे व रेडके हरियाणा मुरा जातीची आहेत.

चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या या कृतीशील निर्णयाचे अनेक दूध उत्पादकांनी स्वागत केले असून, “चेअरमन स्वतः पुढे येऊन दूध संकलन वाढ मोहिमेला चालना देत आहेत अशा प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत.

 

 

यावेळी गोकुळचे डॉ. पी. व्ही. दळवी, डॉ. सागर खोत, डॉ. डी. ए. पाटील, बाळासो मुलाणी, संताजी शुगरचे उस विकास अधिकारी उत्तम परीट, निहाल नायकवडी, लखन पालकर व रामू सातपुते आदी उपस्थित होते.

————————————————————————————————-

फोटो ओळ – खरेदी केलेल्या जातिवंत म्हैशींचे पाहणी करताना गोकुळ चे चेअरमन नविद मुश्रीफ डॉ. पी. व्ही. दळवी, डॉ. सागर खोत, डॉ. डी. ए. पाटील, बाळासो मुलाणी, संताजी शुगरचे उस विकास अधिकारी उत्तम परीट, निहाल नायकवडी, लखन पालकर व रामू सातपुते आदी दिसत आहेत .

————————————————————————————————-

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!