मणी ओवण्याच्या कलेतून साकारलेल्या कलाकृतीचे कोल्हापुरात प्रदर्शन
शनिवारी होणार प्रारंभ, तीन दिवस चालणार प्रदर्शन
प्रतिनिधी, कोल्हापूर
येथील मेघनाताई कामत यांच्या मणी ओवण्याच्या कलेतून साकारलेल्या कलाकृतीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. शनिवार दिनांक 19 जुलै रोजी सुरू होणारे हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. दसरा चौकातील तनिष्क शोरूम मध्ये हे प्रदर्शन भरण्यात आले आहे.
मेघनाताई कामत यांनी मणी ओवण्याच्या कलाकृतीचा वारसा जपलेला आहे. दिवसातून तब्बल 12 तास वेळ देऊन त्यांनी या मणीच्या माध्यमातून अनेक कलाकृती तयार केलेले आहेत. एक कलाकृती तयार करायला तब्बल 40 दिवस लागतात. अशा शेकडो कलाकृती त्यांनी तयार केलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, रा. शाहू महाराज, राजमुद्रा यासह अनेक कलाकृतींचा समावेश आहे. तब्बल 53 हजार मण्यांचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराज तर 51 हजार मण्यांचा वापर करत शाहू महाराजांची अतिशय सुंदर अशी कलाकृती त्यांनी साकारली आहे. याशिवाय अनेक कलाकृती त्यांनी साकारलेली आहेत.
या सर्व कलाकृतींचे प्रदर्शन 19 जुलै पासून आयोजित केले आहे. हे प्रदर्शन 19, 20 आणि 21 जुलै असे तीन दिवस होणार आहे. दसरा चौक येथील तनिष्क शोरूम मध्ये आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन तनिष्क शोरूम चे प्रसाद कामत आणि जय कामत यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी 0231-2683551 या नंबरवर संपर्क साधावा.