ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी नाट्यगृहातील मूळ वस्तू ताब्यात घेण्याचे महापौर सौ.रुपाराणी निकम यांचे निर्देश

Spread the news

ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी नाट्यगृहातील मूळ वस्तू ताब्यात घेण्याचे महापौर सौ.रुपाराणी निकम यांचे निर्देश

­

 

कोल्हापूर, ता. १ : शहराची सांस्कृतिक अस्मिता असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच या नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दुर्घटनेनंतर अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक व पुरातत्त्वीय वस्तू पुन्हा महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी आज प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

  •  

            मंगळवार, दि.३० जून २०२६ रोजी नाट्यगृहासंदर्भात आयोजित बैठकीत समिती सदस्य, हेरिटेज रंगकर्मी, नाट्यकर्मी तसेच विविध क्षेत्रातील कलाकार उपस्थित होते. बैठकीत दुर्घटनेनंतर शिल्लक राहिलेल्या ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्याची मागणी करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेल्या तसेच नाट्यगृहाशी निगडित असलेल्या या वस्तू कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग असल्याने त्यांचे संवर्धन आवश्यक असल्याचे मत महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी व्यक्त केले.

            या पार्श्वभूमीवर महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी शहराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत प्रशासनास लेखी पत्र देऊन या वस्तू विमा कंपनीकडून पुन्हा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर लेखी अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!