राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 27 वा वर्धापनदिन जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरा.*

Spread the news

  • *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 27 वा वर्धापनदिन जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरा.*ji

राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापनदिना निमित्त आज सकाळी ठीक 10.10 वा राष्ट्रवादी भवन,श्री शाहु मार्केटयार्ड येथील जिल्हा कार्यालयात आमचे आदरणीय नेते मा नाम. हसन मुश्रीफसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मा बाबासाहेब पाटील- असुर्लेकर यांच्या शुभ हस्ते आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पक्षाचे विभागीय प्रदेशाध्यक्ष मा नाविद मुश्रीफ,जिल्हा परिषद अध्यक्ष मा.शिल्पाताई खोत,कार्याध्यक्ष मा अनिल साळोखे,गोकुळचे माझी संचालक मा बाबासाहेब खाडे,इचलकरंजी शहराध्यक्ष मा सुहास जांभळे* यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करुन स्वाभिमान सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी 27 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून *मा नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना जिलेबीचे वाटप* करुन वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

­

 

यावेळी नविद मुश्रीफ मनोगत व्यक्त करताना म्हणाले, या वेळचा वर्धापनदिन साजरा करताना आज माझ्या मनात एक वेगळीच भावना दाटून येत आहे कारण आज आपले अजितदादा आपल्यात नाहीत. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने भाषणं होतील, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पक्षाचा झेंडा तितक्याच अभिमानाने फडकेल, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते. कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात धावुन जाणारे, संकटात खंबीरपणे उभे रहाणारे, चुक झाली तर कान धरुन समजावणारे आणि चांगलं काम केलं तर कौतुकाची पाठीवर थाप देणारे दादा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले होते. त्यांनी जपलेला माणुस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्र बिंदु होता आणि म्हणूनच आज राष्ट्रवादी पक्षाचा 27 वा वर्धापनदिन साजरा करताना दादांच्यां स्मृतिना विनम्र अभिवादन करून त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार या निमित्ताने आपण करुया.

  •  

तसेच यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील_असुर्लेकर म्हणाले की,घड्याळ तेच पण वेळ नवी ही विचारधारा घेऊन कार्यकर्ते पदाधिकारी यानी 10 जुन ते 16 जुन 2026 या स्वाभिमान सप्ताहात राष्ट्रवादीची मुळ विचारधारा तळागाळात पोहचविण्या साठी बुथ कमिटी भक्कम करण्यासाठी प्रयत्न करा, तालुका/विधानसभा/नगरपालिका क्षेञ शहराची कार्यकारिणी बांधणी नव्याने करुन नव्या जुन्याचा मेळ साधुन अगामी काळातील निवडणूकीच्या तयारी लागा आपल्याला शिव,शाहु,फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराचा वारसा तसेच स्व यशवंतराव चव्हाण यानीं घालून दिलेला सुसंस्कृत, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख राजकारणाच्या पायावर गेल्या 27 वर्षात यशस्वीपणे उभा राहिलेला राष्ट्रवादी पक्ष आणि मुश्रीफ साहेबांचे हात बळकट करायचे असेल तर जिल्ह्यातुन जास्त आमदार निवडून आणावे लागतील त्यामुळे आज पासून पक्ष संघटनेच्या कामात झोकून देऊन काम करा.

शिल्पाताई खोत, सुहास जांभळे, यासिन मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत व प्रश्नस्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष मा अनिल साळोखे यांनी केले. हातकणंगले विधानसभाध्यक्ष संभाजी पवार यांनी अभार मानले.

  • यावेळी विकास पाटील-कुरुकलीकर, बाळासाहेब देशमुख, निहाल कलावंत, शिरिष देसाई, संजय चितारी, सुनिल कांबळे, संभाजी पाटील-भुयेकर, हर्षवर्धन चव्हाण, शहाजी जठार यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे, जिल्हा सेलचे जिल्हाध्यक्ष, विधानसभाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, नगरपालिका क्षेञशहराध्यक्ष, सहकारी संस्थांचे( केडीसीसी बॅंक, साखर कारखाना) संचालक व पदाधिकारी, जि.प/पं.स सदस्य, नगरपालिका/ महानगरपालिकेचे नगरसेवक, बाजार समिती संचालक यांच्यासह मान्यवर नेतेगण,हपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…..!!

Spread the news

You may also like

error: Content is protected !!