राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बैठकीचे आयोजन
आगामी होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कोल्हापूर शहराची व्यापक बैठक शनिवार दि. 17 मे 2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजता रेल्वे स्टेशन समोरील चंदूकाका सराफ शॉप खालील बेसमेंट मध्ये (व्ही.बी. पाटील यांचे रॉयल मिरज आर्केड कॉम्प्लेक्समध्ये) आयोजित केली आहे.
सदर बैठकीला जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जातील व महापालिका निवडणुकीची रणनीती ठरविण्यात येईल.
तरी सर्व इच्छुक उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व सेल पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आव्हान शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी केले आहे.
——————-