माझ्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरामध्ये सत्यजित नाना कदम वाढदिवस गौरव समिती तर्फे अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. नवजात शिशु व बाल विभागात नवजात बालकांना कपडे व फळे वाटप तसेच पांजरपोळ संस्था येथे गोमातेची पूजन व जनावरांना खाद्य वाटप, सत्यजित श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा, रक्तदान शिबिर व कोल्हापूर शहरात भव्य असे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.
शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपमहापौर अक्षय जरग, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान,नगरसेवक वैभव माने , रत्नेश शिरोळकर, स्वरूप कदम, प्रकाश गवंडी, पिंटू काटकर,अजित मोरे आदी मान्यवरांचे उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.