ओसांडणारी गर्दी, शुभेच्छांचा वर्षाव अन् महाधुरळाचा वर्धापनदिनाचा दिमाखदार सोहळा
कोल्हापूर : राजकीय-सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी…वाचकांचा ओसांडणारा उत्साह आणि तीन शुभेच्छांचा अखंड वर्षाव…अशा उत्साही वातावरणात ‘महाधुरळा…’यू ट्यूब चॅनेलचा दुसरा वर्धापनदिन दिमाखात साजरा झाला. ‘उद्याची बातमी आज…’अशी साद घालत समाजमनाचा विश्वास संपादन करणाऱ्या ‘महाधुरळा’चॅनेलच्या वर्धापनदिनाला मोठया संख्येने उपस्थिती दर्शवित नागरिकांनी प्रेमाची प्रचिती दिली. सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत वर्धापनदिनाचा हा कार्यक्रम रंगला.
यंदाच्या वर्धापनदिनाच्या सोहळयाला गोवा राज्याचे सामाजिक कल्याणमंत्री सुभाष फलदेसाई यांची विशेष उपस्थिती लाभली. आमदार अमल महाडिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार सुजित मिणचेकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, उत्तम पाटील, यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपादक गुरुबाळ माळी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सीए परीक्षेत यश संपादन केलेल्या अभिमान गुरुबाळ माळी यांचाही उपस्थितांनी गौरव केला. याप्रसंगी शुभेच्छा व्यक्त करताना माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी, ‘महाधुरळा’ चॅनेलने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. सध्या पत्रकारितेच्या क्षेत्रातही नवीन आव्हाने उभी ठाकली आहेत. स्पर्धात्मक युग आहे. रोखठोक बातम्या, वास्तवादी चित्रण आणि घडामोडीचं अचूक आकलन या बळावर संपादक गुरुबाळ माळी यांच्या महाधुरळा चॅनेलने वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यांच्या अनेक राजकीय बातम्या या तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. महाधुरळा चॅनेलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.’माजी आमदार सुजित मिणचेकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते लाटकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
नागाळा पार्क येथील बालाजी गार्डन येथे वर्धापनदिन दिनानिमित्त ‘स्नेहमेळावा’आयोजित केला होता. दुपारी साडेचार वाजल्यापासूनच वाचकांनी उपस्थिती दर्शवायला सुरुवात झाली. सायंकाळच्या सहा वाजण्याच्या सुमारास बालाजी गार्डनचा परिसर वाचकांनी फुलला. सारा परिसर शुभेच्छांच्या सरींनी सुगंधित बनला. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, भैया माने, महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी वर्धापनदिन शुभेच्छा सोहळयाला उपस्थिती दर्शवित सदिच्छा व्यक्त केल्या. भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, अॅड. महादेवराव आडगुळे, मारुतराव कातवरे यांनी भेट देऊन सदिच्छा व्यक्त केल्या. गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, प्रा. किसन चौगले, बाबासाहेब चौगले, अजित नरके, अभिजीत तायशेटे, बयाजी शेळके, गोकुळचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, महापालिकेतील नगरसेवक प्रा. जयंत पाटील महापालिकेचे सभागृह नेते मुरलीधर जाधव, परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, महापालिकेतील नगरसेवक अमर समर्थ, नगरसेवक प्रताप जाधव, वैभव माने, स्वरुप कदम, आशकिन आजरेकर, मंगल साळोखे, संगीता सावंत, माधुरी नकाते, अजय इंगवले, माजी उपमहापौर विक्रम जरग, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, राजसिंह शेळके, रामदास भाले, बाबा पार्टे, अशोक जाधव, अजित मोरे, किरण नकाते, पदवीधर मित्रचे माणिक पाटील चुयेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आसिफ फरास, बाबा जांभळे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई, अजिंक्य जाधव, अभय तेंडुलकर, सुधीर राणे, गगनबावडा पंचायत समितीचे राजेश पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक राहुल देसाई, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सभापती प्रवीण यादव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष सातपुते, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, गणेश देसाई, विराज चिखलीकर विजय अग्रवाल, शाहरुख गडवाले, शंतून मोहिते, प्रवीण पाटील, आकाश शेलार, अॅड. परवेझ पठाण, अफजल खाटिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजय करजगार, संजय करजगार, रत्नदीप चोपडे, यांनी शुभेच्छा दिल्या. इचलकरंजी महापौर हे सहकाऱ्यासमवेत येऊन शुभेच्छा दिलया. शिवसेनेचे किशोर घाटगे, शशिकांत बीडकर उपस्थित होते.
कोल्हापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष शिरीष कणेरकर, जयसिंग माने, मधुसूदन सावंत, राजन भोसले, श्री शाहू साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक विजय औताडे, लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा महिला समाजाच्या अध्यक्षा वनदा माळी, युवा नेते दौलत देसाई, कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन, वसंतराव चौगले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अनिल पाटील, बांधकाम व्यावसायिक शंकर पाटील, अभिजीत मगदूम, हॉटेल मालक संघाचे सचिन शानभाग, उमेश राऊत, अरुण चोपदार, उज्ज्वल नागेशकर, बाळ पाटणकर, सराफ व्यावसायिक भरत ओसवाल, व्यावसायिक जयेश ओसवाल, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आर. आर. पाटील, सीए आशिष सेवेकरी, लिंगायत माळी समाजाचे पदाधिकारी इंजिनीअर अण्णासाहेब माळी, कारखानदार प्रभाकर कुलगुडे, राजेंद्र माळी, संतोष माळी, काशीनाथ माळी, अशोक माळी, पाचगावचे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी, छत्रपती ग्रुप पाचगावचे अध्यक्ष सूरज पाटील, विशाल पोवार, अभिजीत बागल, श्रीकांत चौगले, चेंबर ऑफ कॉमर्सचे अनिल धडाम, सामाजिक कार्यकर्त्या सीमा पाटील, गीता हासूरकर, प्राचार्य डॉ. राजकुमार पाटील, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. संदीप पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. जनसुराज्य शक्ती पक्षाचे शहर समन्वयक शांतीभाई लिंबाणी, माजी नगरसेवक संभाजी देवणे, सुभाष रामुगडे, संदीप पोवार, विशाल शिराळकर, कुणाल शिंदे यांनी एकत्र येऊन वर्धापनदिन सोहळयात सहभागी झाले. वीरशैव बँकेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, लिंगायत समाजाचे राजेश पाटील चंदूरकर, सुनील गाताडे, किरण गवळी, राहूल नष्टे, सुहास भेंडे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खणविहार मित्र मंडळातर्फे मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. अॅड. चारुशीला चव्हाण, राजेंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.
साहित्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती….
साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. बी. एम. हिर्डेकर, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, श्री शाहू शिक्षण संस्थेचे मानसिंग बोंद्रे यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डी. आर. मोरे, प्राचार्य व्ही. एम. पाटील, प्रा. डॉ. मंजिरी मोरे, एलआयसीमधील निवृत्त अधिकारी मुरली गावडे, प्राचार्य एस. जे. नाईक, प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण, प्राचार्य विठृठल ढेकळे, प्राचार्य जे.के. पवार, प्रा. शशिकांत चौधरी, प्रा. अनिल घस्ते, प्रा. दिग्विजय पवार, प्रा. प्रकाश इनामदार, शशिकला इनामदार, प्रा. दादासाहेब मोरे, विमल मोरे, प्रा. टी. के. सरगर, प्रा. महेश साळुंखे, हितेंद्र साळुंखे, प्रा. एस. बी. गायकवाड, प्रा. ए. जे. पाटील, प्रा. रुईकर, प्रा. शिवाजी जाधव, प्रा. विनोद कांबळे, डॉ. प्रवीण कोडोलीकर, प्रा. किशोर खिलारे, इतिहास अभ्यासक अशोक मानकर, शिक्षक नेते दादासाहेब लाड, शिक्षक नेते भरत रसाळे, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पोवार, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष नामदेव रेपे, प्रा. के. बी. पाटील, प्रा. एस. पी. चौगले, निशिकांत चाचे, शिक्षक शिवाजी भोसले, अर्जुन पाटील, भालजी पेंढारकर केंद्राचे उमेश बुधले, रणजीत शिंदे, रवींद्र दळवी, बाबा महाडिक, तात्या गायकवाड, अशोक पाटील
प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींनी दिल्या शुभेच्छा…
दैनिक पुढारीचे व्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, निवासी संपादक विजय जाधव, महाराष्ट्र दिनमाचे संपादक विजय चोरमारे, लोकमतचे उपवृत्तसंपादक विश्वास पाटील, सकाळचे जाहिरात विभाग व्यवस्थापक आनंद शेळके, सकाळचे मुख्य प्रतिनिधी निवास चौगले, पुण्यनगरीचे निवासी संपादक चंद्रकांत पाटील, पत्रकार विजय पाटील, सुखदेव गिरी, बाबूराव रानगे, बाळासाहेब पाटील, सुखदेव गिरी, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, ‘तरुण भारत’चे जाहिरात व्यवस्थापक आनंद साजणे, राहुल शिंदे, पत्रकार सुधाकर काशीद,‘तरुण भारत’चे मुख्य प्रतिनिधी विकास कांबळे, पत्रकार कृष्णात पुरेकर, संग्राम काटकर, इम्रान गवंडी, दिपक जाधव, छायाचित्रकार रियाज ट्रेनर, ‘सकलम’चे मनोज साळुंखे, नंदकुमार दिवटे, इम्रान रेठरेकर, लोकसत्ताचे पत्रकार दयानंद लिपारे, डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तेजस राऊत, महराष्ट्र दिनमानचे पत्रकार सतीश घाटगे, पत्रकार नवाब शेख, पत्रकार बाळ कालेकर, नवराष्ट्रचे पत्रकार राजेंद्र पाटील, अहिल्या परकाळे, दीपक घाटगे, ‘जनप्रवास’चे पत्रकार डी. बी. चव्हाण, महेश गावडे, नंदकुमार तेली, विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी व पत्रकार समीर मुजावर, प्रताप नाईक, अमर पाटील, दिपक सुर्यवंशी, विजय केसरकर, मिथुन राजाध्यक्ष, सतेज औंधकर, बी न्यूजचे प्रथमेश कात्रट, छायाचित्रकार नसीर अत्तार,अर्जुन टाकळकर, पत्रकार सुरेश आंबूसकर, पत्रकार बारसकर, विनोद नाझरे, अमोल शिंगे, अपर्णा पाटील, अमोल कुरणे, धनश्री पब्लिसिटीचे ज्ञानदेव पाटील, अक्षय पाटील, जाहिरात संस्थेचे उदय जोशी यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा माहिती अधिकारी सचिन आडसूळ, छायाचित्रकार अनिल यमकर यांनी शुभेच्छा दिल्या.




