पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती साठी 30 जून पर्यंत मुदतवाढ : भरत रसाळे
कोल्हापूर :राज्यातील खाजगी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये पवित्र पोर्टल प्रणालीतून करावयाच्या शिक्षक पदभरती साठी 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाली असलेची माहिती महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली आहे .
समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती साठी शाळांना 15 जून पर्यंत मुदत दिली होती . तथापि या तारखे पर्यंत राज्यातील शाळांची संच मान्यता होऊन रोस्टर तपासणी करणे व त्यानंतर जाहिरात अपलोड करणे या बाबी साठी हा कालावधी अपुरा होता . त्यामुळे आमच्या संघटने मार्फत निवेदन देऊन पवित्र पोर्टल अंतर्गत पदभरती साठी मुदत वाढ देणेची मागणी मा .प्रधान शिक्षण सचिव व शिक्षण आयुक्त यांचेकडे करण्यात आली होती व त्यांच्याकडे याबाबतीत प्रयत्न चालू होते .या प्रयत्नास यश येऊन पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत पदभरतीसाठी 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे .याबद्दल आम्ही शासनाचे आभार मानत आहोत असेही भरत रसाळे यांनी यां निवेदनात नमूद केले आहे .





