केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी घेतली सदिच्छा भेट

Spread the news

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी घेतली सदिच्छा भेट
कागल,प्रतिनिधी.

­

 

नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी सदिच्छा भेट घेतली.भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर घाटगे यांनी गडकरी यांची घेतलेली ही पहिलीच औपचारिक भेट ठरली.या भेटीत उभयंतामध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
विशेषतः कागलमधील प्रस्तावित पिलरवरील उड्डाणपूल, रस्त्यांची सुधारणा तसेच वाहतूक सुलभतेसाठी आवश्यक असलेल्या इतर अनुषंगिक बाबींवर तपशीलवार चर्चा झाली.
यावेळी गडकरी यांनी आपल्या बायोफ्युएल संकल्पनेचा पुनरुच्चार केला. शेतकरी हा केवळ अन्नदाता न राहता ‘ऊर्जादाता’ व्हावा,यासाठी साखर कारखान्यांनी सीएनजीसह इतर पर्यायी इंधन निर्मितीवर भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासोबतच देशाच्या ऊर्जा स्वावलंबनालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच भारतीय जनता पक्षाची ध्येय-धोरणे आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी याबाबतही या भेटीत चर्चा झाली. स्थानिक पातळीवर विकासकामांना गती देत जनतेपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यावर भर देण्याबाबत मंत्री महोदयांनी घाटगे यांनी मार्गदर्शन केले.

  •  

छायाचित्र- नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सदिच्छा भेटीवेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे .


Spread the news

You may also like

error: Content is protected !!