शिक्षकेतर कर्मचारी समायोजन विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरे

Spread the news

शिक्षकेतर कर्मचारी समायोजन विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरे
कोल्हापूर दि. २१ : राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचार्यांचे माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्याच्या आदेशा विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये याचिका दाखल करणार असल्याचे, महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले.
राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांतील लिपिक व सेवकांचे समायोजन त्याच संस्थेच्या माध्यमिक शाळांमध्ये करण्याचे आदेश 17 एप्रिल 2026 रोजी राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. सदरच्या कर्मचाऱ्यांची पदे ही एकाकी पदे असून, गतवर्षीच्या संचमान्यते अखेर सदरची पदे कार्यरत दाखविण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे सेवानिवृत्ती पर्यंत त्याच प्राथमिक शाळेत कार्यरत ठेवावीतअशी मागणी याचिकेत करण्यात येणार आहे.
महासंघाच्या पुणे शाखेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.महासंघाच्या कोल्हापूर,सांगली, सातारा,सोलापूर या शाखांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे.
बैठकीला महासंघाचे राज्यसचिव राजेंद्र कोरे राज्य सल्लागार एम.डी.पाटील, उपाध्यक्ष प्रदीप,मगदूम, जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव, शहर शिक्षकेतर प्रमुख अर्जुन चाफोडीकर, गीता चव्हाण, सुचिता अग्निहोत्री, रूपाली कुलकर्णी, दिपाली जोशी, संजय चव्हाण 3 उदय चिंदके, जितेंद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

­

 

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!