*आमदार राजेश क्षीरसागर यां चे काहीतरी काम राहिले असेल म्हणून ते अधिकाऱ्यांच्या वर हक्कभंग आणतो म्हणत असतील*
*आमदार सतेज पाटील यांची टीका*
*कोल्हापूर:* आमदार राजेश क्षीरसागर यांचे काहीतरी काम राहिल असेल म्हणून ते अधिकाऱ्यांच्या वर हक्कभंग आणतो म्हणत असतील. अशी शंका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे. नुसते अधिकाऱ्यांना बोलण्याने आणि हक्क भंग आणतो वगैरे बोलून उपयोग नाही. तर त्यांनी आता लगेच हकभंग आणावा. अधिकाऱ्यांच्यावर ते कशासाठी हक्क भंग आणत आहेत. हे देखिल त्यांनी जाहीर करावे. असे आव्हानही त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना केले.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील हे आज एका बैठकीसाठी काँग्रेस कमिटी कार्यालयात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक राज येऊन या ऑक्टोबरला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, महानगरपालिकेचा सर्व कारभार आलबेल सुरू असल्याची टीका त्यांनी केली. प्रशासकांच्या काळात कोणाचा कोणाला पायपोस नाही. फुलेवाडी येथे अग्निशमन विभागाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून मजूर ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. यावरही आमदार सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या कामाचे टेंडर कोणाच्या दबावाखाली देण्यात आले काय यांचे सत्य जनतेसमोर आले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी या चौकशी मध्ये कोणालाही क्लीनचीट देऊ नये. अशी मागणीही त्यांनी केली.
थेट पाईपलाईन योजना सुरू झाल्या पासून विरोधकांच्याकडून यामध्ये राजकारण करण्यात येत असल्याचा आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केला. थेट पाईप लाईन मधून कोल्हापूर शहरासाठी किती पाणी मिळते याची आकडेवारी महानगरपालिकेकडे आहे. मात्र राजकारण न करता थेट पाईपलाईन मधून आलेल्या पाण्याचे वितरण कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे होईल, आणि त्यामध्ये असलेल्या त्रुटी महानगरपालिकेने काढल्या पाहिजे.
कोल्हापूर शहरात गेल्या पाच वर्षापासून प्रशासकराज आहे. ज्यांना शहरात टाक्या उभा करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांनी ते काम केलेले नाही. त्या बदल्यात त्यांना 23 कोटीचा दंड लावण्यात आला आहे, असे असताना विनाकारण आरोप करणे चुकीचे आहे. ज्यांना दंड लावले ते कॉन्टॅक्टर खाडे आहेत. त्यांनी हा दंड माफ व्हावा यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. मात्र विनाकारण काहीही काढत असाल आणि तुम्ही एक माझ्या विरोधात बोलला तर मी सात तुमच्या विरोधात बोलेन. शहरातील पाणीपुरवठ्यावर राजकारण करण्याऐवजी आणि आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा शहरातील दोन्ही आमदारांनी प्रशासनाची बैठक घेऊन शहरातील पाणीपुरवठ्यासंबंधी तोडगा काढायला हवा. असेही त्यांनी सांगितले.
सरकार मधल्या दोन्ही सत्ताधारी आमदारांना माझे आव्हान आहे शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले, रस्त्याचे काम योग्य दर्जाचे झाले की नाही याची तपासणी करा. असे आवाहन देखील त्यांनी केले. अधिकाऱ्यांच्या वर हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा देणारे आमदार राजेश क्षीरसागर यांचे काहीतरी काम राहिल असेल म्हणून ते अधिकाऱ्यांच्या वर हक्कभंग आणतो म्हणत असतील. अशी शंकाही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. नुसते अधिकाऱ्यांना बोलण्याने आणि हक्क भंग आणतो वगैरे बोलून उपयोग नाही. तर त्यांनी आता लगेच हकभंग आणावा. असे आव्हानही त्यानी आमदार राजेश क्षीरसागर यांना केले.
दरम्यान , केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाबाबत बोलताना त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर, या नाट्यगृहाच्या कामाचा नव्याने आराखडा बनवण्यात आला होता. त्यामध्ये चुका झाल्याचे, माध्यमातून निदर्शनास आले. खासदार शाहू महाराज यांनी देखील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाबतीत काही सूचना केल्या होत्या. मात्र त्यांना देखील फसवण्यात आले असा आरोपही त्यांनी केला. एखाद्या विकास कामावर आम्ही बोललो तर विरोधक बोलले असा आरोप, सत्ताधाऱ्यांकडून होत असतो. मात्र शहरातील जी कामे होत आहेत ती दर्जेदार आणि जनतेच्या हिताची झाली पाहिजे अशी अपेक्षाही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.