इचलकरंजी येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक

Spread the news

इचलकरंजी येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या बैठकीत संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील नियोजन, जनसंपर्क अभियान, बूथ सक्षमीकरण तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे मार्गदर्शनही केले.
सशक्त संघटना, समर्पित कार्यकर्ते आणि विकासाभिमुख विचारसरणीच्या बळावर भारतीय जनता पार्टी जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहे.
यावेळी महापौर उपमहापौर सभापती नगरसेवक नगरसेविका प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Spread the news

You may also like

error: Content is protected !!