*सांत्वनपर साथ – सहवेदनारूपी हात*
श्री महालक्ष्मी अन्नछत्रचा सेवाभावी उपक्रम – *दुःखद प्रसंगी गरजू कुटुंबांना
मिळणार जेवण –
एखाद्या कुटुंबात दुःखद घटना घडली आणि त्यांचे नातेवाईक जवळ नसले तर त्यावेळच्या त्यांच्या जेवणाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आता श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे त्यांना दोन दिवस जेवणाचे डबे दिले जाणार आहेत. श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टतर्फे समाजातील गरजूंसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. त्यात अजून एक पाऊल पुढे टाकत एका अनोख्या मदतीचा उपक्रम ट्रस्ट तर्फे सुरु करीत आहोत. गेल्या काही दिवसांत असे अनुभवास आले की, शहरातील उपनगरात राहणाऱ्या काही कुटुंबांचे शहरात कुणीच नसल्याने त्यांच्या दुःखद प्रसंगी फारसे कुणी त्यांच्या जवळ नसते. पूर्वीप्रमाणे अशा दुःखद प्रसंगी जेवण द्यायची प्रथाही हळूहळू बंद होत निघाली आहे.याच पार्श्वभूमीवर ट्रस्टने हा जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित कुटुंबाचे दुःख कमी करु शकत नसलो तरी त्यांना आवश्यक त्या काळात सकाळी व रात्री जेवणाची सोय करणे शक्य आहे, या भावनेतून हा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. आपल्या परिसरात अशी काही कुटुंबे असल्यास त्याची माहिती नागरिकांनी ट्रस्टला द्यावी. ट्रस्ट त्याची योग्य ती खात्री करुन जेवणाची सुविधा त्या कुटुंबाला देणार असल्याचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सांगितले आहे.
संपर्क नं :
श्री. राजू मेवेकरी
9420455640



