Spread the news

जत/ प्रतिनिधी:-

­

 

जतचे विकासपुत्र आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्यासाठी महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रस्ताव सादर करून संखला दुय्यम निबंधक कार्यालय होण्यासाठी पाठपुरावा करावा जत पूर्व भागातील पक्षकारांची मागणी.

  •  

जत तालुका हा सांगली जिल्ह्य़ातील विस्ताराने सर्वात मोठा असा कर्नाटक राज्याच्या सीमेवरील दुष्काळी तालुका असून या तालुक्यात एकशे एकविस गावांचा समावेश होतो.

तालुक्याचे विभाजन केले तर या तालुक्याचे तीन तालुक्यात विभाजन करणे शक्य आहे.परंतु शासनाने जत तालुक्याचे विभाजन दोन तालुक्यात करण्याच्या दृष्टिकोनातून मोठी लोकसंख्या असलेल्या संखची निवड केली आहे.

संख अप्पर तहसिलदार कार्यालय अंतरंग संख,तिकोंडी,उमदी व माडग्याळ या चार मंडल विभागाचा समावेश होतो.अप्पर तहसिलदार कार्यालय संख अंतर्गत असलेल्या या चार मंडल विभागात एक्कावन्न गावांचा समावेश होतो.

जत तालुक्यातील या मंडल विभागातील लोकांना महसुली कामासाठी यापूर्वी जत तहसिलदार कार्यालयात यावे लागत होते.यामध्ये लोकांचा वेळ व पैसा जात होता.परंतु संख येथे अप्पर तहसीलदार कार्यालय झाल्यामुळे येथिल लोकांची सोय झाली आहे.

तरीही संख अप्पर तहसिलदार कार्यालय अंतर्गत असलेल्या चार मंडल विभागातील लोकांना जमिनी व घरांचे खरेदी- विक्री व अन्य कामासाठी येथिल दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागते .या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे काम लगेच होईल याची खात्री नसते,कारण काही वेळा सर्व्हर डाऊन होणे, विध्दूत पुरवठा खंडीत होणे आदी कारणामुळे पक्षकारांची कामे न होता त्यांना हेलपाटे घालावे लागतात.यामुळे त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो.त्यामुळे संख या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय होणेसाठी जतचे विकासपुत्र आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसुल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवावा.महसुल मंत्रालयाकडून तो प्रस्ताव जिल्हाप्रशासनाकडे येऊन लवकरच हा प्रस्ताव मंजूर होऊन संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे संख अप्पर तहसीलदार कार्यालय अंतर्गत असलेल्या चार मंडल विभागातील एक्कावन्न गावातील पक्षकारांचा दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन जमिन व घर खरेदी- विक्री करण्याचा प्रश्न मार्गी लागेल.

संख येथील लोकांना सिटीसर्वेच्या कामासाठी भूमी अभिलेख कार्यालय जतला यावे लागते संख या ठिकाणी भूमिअभिलेख कार्यालय मंजूर झाल्यास लोकांची सोय होणार आहे.

अप्पर तहसिलदार कार्यालय संख अंतर्गत चार मंडल विभागातील एक्कावन्न गावातील पक्षकारांसाठी संख येथे ग्रामन्यायालय सुरू झाले आहे.

संख येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर असून या पुढील काळात संखची वाटचाल ही संख तालुका निर्मीतीकडे झाल्याशिवाय राहणार नाही.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!