सुहास देशपांडे यांना इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी

Spread the news

*सुहास देशपांडे यांना इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी.*

­

 

कोल्हापूर : औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योजक श्री. सुहास प्रभाकर देशपांडे यांनी डी. वाय. पाटील अॅग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी येथून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (लीन मॅनेजमेंट) या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

  •  

त्यांच्या संशोधनाचा विषय “एनहान्सिंग इंडियन एसएमईज थ्रू लीन मॅन्युफॅक्चरिंग फॉर सस्टेनेबल ग्लोबल ग्रोथ” असा असून, भारतीय लघु व मध्यम उद्योगांना (एसएमईज) लीन मॅन्युफॅक्चरिंगच्या तत्त्वांचा अवलंब करून जागतिक स्तरावर शाश्वत आणि स्पर्धात्मक वाढ साध्य करण्यासाठी उपयुक्त धोरणांचा त्यांनी अभ्यास केला आहे.

त्यांना या संशोधनासाठी प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले, तर डॉ. एम. एम. नरके यांनी सह-मार्गदर्शक म्हणून मोलाचे सहकार्य केले.

श्री. सुहास देशपांडे हे उद्योगक्षेत्रातील अनुभवी उद्योजक असून, त्यांच्या व्यावहारिक अनुभवाला संशोधनाची जोड मिळाल्यामुळे त्यांच्या प्रबंधाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील प्र कुलपती ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ ए के गुप्ता यांनी अभिनंदन केले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!