शिक्षकांच्या न्यायाच्या लढ्याला मिळाली नवी दिशा! आमदार रोहित पवार साहेब यांनी घेतली उप मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांची भेट

Spread the news

*शिक्षकांच्या न्यायाच्या लढ्याला मिळाली नवी दिशा!*

­

 

*आमदार रोहित पवार साहेब यांनी घेतली उप मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांची भेट.*

  •  

राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार यांनी उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
टप्पा अनुदान, संच मान्यता, जुनी पेन्शन, वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना, निवृत्तीचं वय यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केली. तसेच हा विषय शिक्षणमंत्री यांच्याशी समन्वयाने मार्गी लावून आवश्यक निधीसाठी मुख्यमंत्री महोदयांशीही चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
आझाद मैदानावर न्यायासाठी लढणाऱ्या शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत हा प्रश्न शासनाने आता अधिक काळ प्रलंबित ठेवू नये. हजारो शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्याशी निगडित असलेल्या या प्रश्नांवर त्वरित निर्णय होणे ही काळाची गरज आहे.
आधी न्याय… मगच माघार!
#TeacherJustice #अनुदान #शिक्षकआंदोलन #RohitPawar #EknathShinde #Maharashtra

रविंद्र तम्मेवार

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


Spread the news

You may also like

error: Content is protected !!