समस्त शिंपी समाजाच्या सदैव पाठीशी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

Spread the news

समस्त शिंपी समाजाच्या सदैव पाठीशी

­

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

  •  

गडहिंग्लज व आजरा येथील समस्त शिंपी समाजाच्यावतीने कृतज्ञतापर सत्कार

गडहिंग्लज, दि. ४:
समस्त शिंपी समाजाच्या सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात गडहिंग्लज व आजरा येथील समस्त शिंपी समाजाच्यावतीने श्री. मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार करण्यात आला.

समस्त शिंपी समाजाच्यावतीने नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा पुणेरी पगडी, वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेले विणा, श्री. विठ्ठल – रुक्मिणी व संत शिरोमणी नामदेव महाराजांची मूर्ती देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, संत शिरोमणी नामदेव महाराज हे आध्यात्मिक मार्गदर्शक आणि समाजाचे आदर्श आहेत. नामदेव महाराजांचे विचार वारकरी संप्रदायाचे आणि विशेषता शिंपी समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. गेल्यावर्षीच स्थापन झालेल्या समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या समाजातील बेरोजगारांचे प्रश्न सोडवून उद्योग, व्यवसायातून रोजगार वाढीला चालना देऊ.

यावेळी समाजाच्यावतीने बोलताना नवी दिल्लीच्या अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचे कौन्सिलर भारत कोळेकर म्हणाले, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर येथे शिंपी समाजाचे “संत शिरोमणी नामदेव महाराज विश्व महासंमेलन” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील शिंपी समाजातील नागरिक संमेलनासाठी गेले होते. त्यासाठी नामदार हसन मुश्रीफसाहेब यांनी फार मोठे सहकार्य केले. या कृतज्ञतेच्या भावनेतूनच समाजाच्यावतीने हा सत्कार करण्यात आला.

यावेळी भारत कोळेकर, तुकाराम खटावकर, अरुण खटावकर, किरण खटावकर, अरुण मुळे, सुप्रिया रेळेकर, प्रियांका औंधकर, सुनीता खटावकर, भारती मुळे, रुक्मिणी कोळेकर, राधिका काकडे, सुमन पिसे, लक्ष्मी पिसे, हर्षदा हावळ, संदीप कोळेकर, दत्ता हावळ, हेमंत हावळ, अरुण हावळ, आनंदा पिसे, संजय मिरजकर, अमित खटावकर, गजानन काकडे, मधुकर मुळे, यांच्यासह शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!