कलेचे आणि कलाकारांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या : आमदार राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका प्रशासनास सूचना; केशवराव भोसले नाट्यगृहाबाबत बैठक

Spread the news

कलेचे आणि कलाकारांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या : आमदार राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका प्रशासनास सूचना; केशवराव भोसले नाट्यगृहाबाबत बैठक

­

 

कोल्हापूर दि.२३ : ऑगस्ट २०२४ मधील भीषण आगीत पूर्णपणे जळून खाक झालेल्या या ऐतिहासिक नाट्यगृहाची उभारणी आता अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत कोल्हापूर महानगरपालिका (KMC) प्रशासन, कंत्राटदार आणि रंगकर्मी यांची एक महत्त्वाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.
केशवराव भोसले नाट्यगृह पूर्णत्वास येतं आहे, हे होत असताना महापालिकेने नाट्यगृह मॅनॅजमेंट साठी देण्याचा ठराव पास केला. रंगकर्मियांच्या भावना याबाबतीत तीव्र होत्या,समज- गैरसमज होते यावरच चर्चा करण्यासाठी आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासन आणि रंगकर्मी यांची बैठक घेतली.
यावेळी दोन्ही बाजूनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका आयुक्त आणि महापौर यांना रंगकर्मीयांच्या भावना लक्षात घेऊन पून्हा एकदा महासभेत चर्चा करावी आणि निर्णय घ्यावा, असे सांगितले. तसेच शहराचा लोकप्रतिनिधी या नात्याने रंगकर्मीवर अन्याय होणार नाही,कुठलाही आर्थिक बोजा त्यांच्यावर पडणार नाही,कलेच कुठलंही नुकसान होणार नाही, यासाठी सतर्क असल्याची ग्वाही दिली. तसेच कोणताही निर्णय घेत असताना त्या त्या विषयातील तज्ञासोबत सल्ला मसलत करूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना करणार असल्याचे सांगितले. तसेच केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात असून अंतिम टप्प्यातील डीपी बसवायच्या कामासाठी माझ्या निधीतून तातडीने ₹१.८० कोटींचा निधी दिला असून लवकरात लवकर हे काम पुर्ण होईल आणि ९ ऑगस्ट रोजी मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या दौऱ्यावेळी केशवराव भोसले नाट्यगृह, रंकाळा फॉउंटन, छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ,पूर नियंत्रण प्रकल्प आदी प्रकलपाचे उदघाटन करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
बैठकीला आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, महापौर सौ. रूपाराणी निकम,अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, यांच्यासह रंगकर्मी, शिवसेना पदाधिकारी, महानगरपालिका प्रशसनातील अधिकारी उपस्थित होते..

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!