तीर्थ विठ्ठल : गुणीदास फाऊंडेशनची भक्ती संगीत वारी

Spread the news

तीर्थ विठ्ठल : गुणीदास फाऊंडेशनची भक्ती संगीत वारी गुणीदास फाऊंडेशन तर्फे शनिवार दिनांक २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशी निमित्त सायंकाळी सहा वाजता ‘तीर्थ विठ्ठल’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आमचे आधारस्तंभ आणि गुणीदास फाऊंडेशनच्या सुरवातीच्या काळात आम्हाला आर्थिक सहकार्य करून संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी मदत करणारे उद्योजक कै. बापूसाहेब जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गेली अनेक वर्षे सातत्याने तीर्थ विठ्ठल, या लोकप्रिय अभंग आणि भावभक्ती गीतांच्या संगीताच्या वारीचे आयोजन गुणीदास फाऊंडेशन करीत आहे. या कार्यक्रमात अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त कलाकारांनी हजेरी लावली आहे. या वर्षी सुप्रसिद्ध गायक जयदीप वैद्य आणि सुप्रसिद्ध गायिका अंजली मराठे या दोन दिग्गज कलाकारांच्या अभंग आणि भक्तिगीतांचा आस्वाद रसिकांना घेता येईल. या कलाकारांना डॉ. सचिन जगताप, केदार गुळवणी, पार्थ भूमकर, स्वरूप दिवाण, हरी जोशी, आशय कुलकर्णी आणि राजप्रसाद धर्माधिकारी या सुप्रसिद्ध कलाकारांची साथ संगत लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल दामले करणार आहेत. गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, कोल्हापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले असून हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे. प्रवेशिका २१ तारखेपासून संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत देवल क्लब येथे उपलब्ध होतील. तरी जस्तितजास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. कार्यक्रमास येताना वारकरी वेशभूषेत यावे असे गुणीदास फाऊंडेशनचे अध्यक्ष सुस्मिता सप्रे, कार्यक्रम प्रमुख राजप्रसाद धर्माधिकारी आणि सेक्रेटरी डॉ. अजित शुक्ल यांनी कळविले आहे.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!