जिल्हा काँग्रेस कमिटीत अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना आदरांजली

Spread the news

*जिल्हा काँग्रेस कमिटीत अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना आदरांजली*
_______________________________
कोल्हापूर दि. १ ऑगस्ट २०२६ – कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण केसरकर व माजी उपमहापौर संजय मोहिते,यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन केले. सदर कार्यक्रमात शहराध्यक्ष प्रवीण केसरकर व भारती पवार यांनी लोकमान्य टिळक यांचा देश स्वातंत्र्य लढा व काँग्रेस विचारसरणी अण्णाभाऊ साठे यांचा संयुक्त महाराष्ट्रातील सहभाग याविषयी आपले विचार मांडले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तौफिक मुलांनी यांनी आभार मानले सदर कार्यक्रमास खालील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संजय पवार वाईकर, विनायक घोरपडे, संजय पटकारे, एन एन पाटील, उदय पवार, डॉ. प्रमोद बुलबुले, गणेश शिंदे, डॉ. अमोल देसाई, हेमा लूगारे, उदय फाळके, चंदा बेलेकर, आर. एम. भोसले, संदीप बिरांजे, दीपक थोरात, रोहित गाडीवर, सौ भारती पवार, वैशाली महाडिक, अभिजीत देठे, संदीप मोहिते ओंकार मगदूम युवराज पाटील बाबुराव कांबळे इ.

­

 

 

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!