Spread the news

*वारणा विद्यापीठाच्या वारणा स्कूल ऑफ लॉ प्रवेशासाठी शेवटची संधी*
*नवीन नोंदणी व विकल्प अर्जासाठी तारखा जाहीर*
वारणानगर (प्रतिनिधी): वारणा विद्यापीठ अंतर्गत वारणा स्कूल ऑफ लॉ या महाविद्यालयाचा पाच वर्षे व तीन वर्षे विधी अभ्यासक्रम सीईटी प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीत नव्याने समावेश करण्यात आला आहे.
राज्य सीईटी अंतर्गत विधी अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू असून, द्वितीय फेरीतील प्रवेश 20 ऑगस्ट 2025 रोजी पूर्ण झाले आहेत. तृतीय फेरीकरिता उमेदवारांना महाविद्यालय विकल्प अर्ज भरणे बंधनकारक आहे. यासाठी नवीन अर्ज करणारे तसेच प्रथम व द्वितीय फेरीत प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांना अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्ज व विकल्प भरण्याच्या तारखा
एल.एल.बी. – 5 वर्ष अभ्यासक्रम : 29 ऑगस्ट 2025 ते 30 ऑगस्ट 2025
एल.एल.बी. – 3 वर्ष अभ्यासक्रम : 1 सप्टेंबर 2025 ते 3 सप्टेंबर 2025
उमेदवारांना आवाहन
वारणा स्कूल ऑफ लॉमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत नवीन नोंदणी, संपादन व महाविद्यालय विकल्प अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे सीईटी सेलच्या केंद्रीभूत पद्धतीनुसार होणार असून, उशिरा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांनी विद्यार्थ्यांना विधी शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल करिअर घडविण्याची संधी साधण्याचे आवाहन केले आहे. वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी गुणवत्तापूर्ण विधी शिक्षण व आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत माहिती दिली. तर श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!