वारणा विद्यापीठाचे पहिले कुलाधिकारी म्हणून श्री. एन. एच पाटील यांची नियुक्ती*

Spread the news

*वारणा विद्यापीठाचे पहिले कुलाधिकारी म्हणून श्री. एन. एच पाटील यांची नियुक्ती*o

 

 

  •  
  1. वारणा विद्यापीठ, वारणानगर, जिल्हा कोल्हापूर या विद्यापीठाचे, पहिले कुलाधिकारी (प्रोवोस्ट) म्हणून श्री. नामदेव हिंदुराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल . सी. पी. राधाकृष्णन यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित आदेश उच्च व तांत्रिक शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाने १५ मे २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार करण्यात आला आहे.

वारणा विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय प्रगतीसाठी त्यांच्या अनुभवाचा मोठा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कुलाधिकारी श्री.पाटील हे पारगांवचे सुपुत्र असून सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष, तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती संस्थेचे अध्यक्ष, वारणा साखर कारखान्याचे तज्ञ संचालक यासह विविध संस्थांची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.सुराज्य फाऊंडेशनची स्थापना 2006 मध्ये झाली. ही संस्था धार्मिक, कृषी, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत कार्यरत असून ग्रामीण विकास, सहकार आणि सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे.

अध्यक्ष, वारणा विविध उद्योग शिक्षण समूह डॉ. विनयरावजी कोरे, विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिनी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!