Spread the news

­शक्तीपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा9
कोल्हापूर : शेतकऱ्यांना भूमीहीन करुण त्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने येत्या मंगळवारी (दि.९) कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आली. सकाळी ११ वाजता दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. दसरा चौकातून हा मोर्चा व्हिन्स कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. या मोर्चात खासदार शाहू छत्रपति, विधानपरिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी,आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार के. पी. पाटील, संपतबापू पवार -पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, राजीव आवळे, ए. वाय. पाटील, शिवसेना उपनेते संजय पवार, शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उदय नारकर, अतुल दिघे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, रविकिरण इंगवले, गोकुळचे संचालक चेतन नरके, शशिकांत पाटील चूयेकर,बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, शिंदेगटाचे शिवसेनेचे सचिन विश्वास पाटील, कुंभीचे संचालक किशोर पाटील, जिल्हा बॅक संचालक सुधीर देसाई, बाबासो देवकर, गोपाळराव पाटील, जि प सदस्य एकनाथ पाटील, विश्वनाथ उर्फ हामु पाटील, राजेंद्र सूर्यवंशी,राहुल देसाई, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अजित पोवार, राष्ट्रवादी गटाचे जि प सदस्य मनोज फराकटे, विक्रांत पाटील किणीकर, संपत देसाई, सम्राट मोरे, सत्यजीत जाधव, पी डी घुंदरे, सदाशिव चरापले, हिंदुराव चौगले, बाळासाहेब सरनाईक, रणधीर मोरे, उदय पाटील, शामराव देसाई, आर वाय पाटील, सर्जेराव देसाई,शिवाजी मगदूम,किशोर पाटील,बालाजी फराकटे, धीरज डोंगळे,रणधीर मोरे, डॉ. के. एन. पाटील यांच्यासह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे समन्वयक गिरीष फोंडे व प्रकाश पाटील यांनी दिली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!