जिल्हा परिषद समाजकल्याण सभापतीपदी श्रद्धाताई गायकवाड यांनी स्वीकारला पदभार.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीपदी श्रद्धाताई गायकवाड यांनी आज पदभार स्वीकारला.
माझ्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.या प्रसंगी विविध पदाधिकारी,अधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी श्रद्धाताई गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील समाजकल्याण विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्या निश्चितपणे प्रयत्नशील राहतील, असा विश्वास व्यक्त केला. समाजातील वंचित,दुर्बल आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने काम करतील,असेही नमूद केले.
यावेळी नूतन सभापती श्रद्धाताई गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून पदाची जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी माजी आमदार उल्हास पाटील,कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पाताई खोत,उपाध्यक्ष तानाजी पाटील,सभागृह नेते सुधीर देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर, नवनियुक्त जिल्हा परिषद अधिकारी जस्मिन मॅडम,अर्थ व शिक्षण सभापती शितल यादव,महिला आणि बालकल्याण सभापती विद्या पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती सारिका नांदेकर,जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण,उत्तरादेवी शिंदे,प्रचिता कोळी,पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे,सुभाषसिंग रजपूत,सागर शंभूशेटे,प्रकाश पाटील टाकवडेकर,नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर,अमरसिंह पाटील, भवानीसिंग घोरपडे,अविनाश गायकवाड,सर्व पंचायत समिती सदस्य,यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी,सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.