महात्मा बसवेश्वर महाराजांच्या तैलचित्राला विधानसभेत मानाचे स्थान; राहुल नार्वेकरांची अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या कार्यक्रमात ऐतिहासिक घोषणा
मुंबई 16 जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवतावादी विचारांना महाराष्ट्राच्या सर्वोच्च लोकशाही सभागृहात मानाचे स्थान मिळणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर साहेब यांनी महात्मा बसवेश्वर महाराजांचे तैलचित्र लवकरच महाराष्ट्र विधानसभेत लावण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
विधानसभा अध्यक्षांच्या या घोषणेमुळे संपूर्ण लिंगायत समाजामध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, ही समाजासाठी ऐतिहासिक आणि गौरवास्पद बाब मानली जात आहे.
या कार्यक्रमास देशाचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे साहेब, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर साहेब, कर्नाटकचे मंत्री मा. ईश्वर खंडरे साहेब, माजी आमदार अध्यक्ष विश्वनाथ चाकोते कोते, तसेच लिंगायत समाजातील नामांकित उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान आणि जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विचारांना महाराष्ट्र विधानसभेत मिळणारे मानाचे स्थान, या दोन्ही ऐतिहासिक घडामोडींमुळे मुंबईतील हा सोहळा लिंगायत समाजासाठी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.
महात्मा बसवेश्वर महाराजांचे समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे विचार महाराष्ट्र विधानसभेच्या माध्यमातून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर साहेबांची ही घोषणा निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे.



