श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पतसंस्था सभासद कल्याण योजनेतून रुपये  4 लाख 79 हजार 165 रकमेचे अर्थसहा

Spread the news

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पतसंस्था सभासद कल्याण योजनेतून

­

 

रुपये  4 लाख 79 हजार 165 रकमेचे अर्थसहाय्य.

  •  

कोल्हापूर  दि. 25 :  येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या

सभासद कल्याण योजनेतून मयत सभासद संस्थेचे सभासद कै. पाटील सुरगोंडा आनंदा, शाखा न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज यांच्या  वारसांना रक्कम रुपये 4 लाख 79 हजार 165 रकमेचे अर्थसहाय्य श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य श्री अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते देण्यात आले.

            एखाद्या सेवकाच्या  किंवा सभासदाच्या आकस्मित निधनामुळे होणारे कुटुंबाचे नुकसान हे मोठे असते, अशावेळी एखादे छोटेसे आर्थिक सहकार्यही त्यांच्या कुटुंबांना दुःखामध्ये सावरणेसाठी महत्त्वाचे असते आणि अशावेळी पतसंस्थेने सहकार्य केल्याने संस्थेच्या या योजनेस सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. पतसंस्थेकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेमधे सर्व सभासदांनी सहभाग घेऊन भविष्यामधील कुटुंबाचा संभाव्य आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य श्री अभयकुमार साळुंखे यांनी केले .

पतसंस्थेचे सभासद कै. पाटील सुरगोंडा आनंदा, शाखा न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज यांनी पतसंस्थेकडे सभासद कल्याण ठेव योजनेमध्ये सहभाग घेतला होता. त्यांचे दिनांक 9/6/2026 रोजी अकस्मित निधन झाले. त्यांनी संस्थेकडे कर्ज घेते वेळी सदर योजनेत भाग घेतल्यामुळे, त्यांच्या वारसांना कल्याण ठेव योजनेतून 4 लाख इतक्या रकमेचे अर्थसहाय्य उपलब्ध झाले. सदर कै सुरगोंडा पाटील यांचे संस्थेकडील शेअर्स व अन्य जमा रक्कम यांच्यासह रक्कम रुपये 4 लाख 79 हजार 165 इतक्या रकमेचा चेक त्यांच्या वारसांना शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व संस्था कुटुंबप्रमुख माननीय प्राचार्य श्री अभयकुमार साळुंखे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. श्री. हितेंद्र सूर्याजीराव साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, व्यवस्थापक कमिटी सदस्य व कोल्हापूर विभाग प्रमुख श्री श्रीराम साळुंखे, शिक्षणसंस्थेचे  सहसचिव श्री सिताराम गवळी,  सातारा विभाग प्रमुख श्री शशिकांत काटे व पुणे विभाग प्रमुख श्री साकोरे, पतसंस्थेचे सेक्रेटरी श्री. संपत वेटाळे उपस्थित होते .


Spread the news

You may also like

error: Content is protected !!