आषाढी एकादशीनिमित्त ‘गोकुळ’च्या दुधाची उच्चांकी विक्री

Spread the news

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि., कोल्हापूर

­

 

!! बातमी !!

  •  

आषाढी एकादशीनिमित्त ‘गोकुळ’च्या दुधाची उच्चांकी विक्री

गतवर्षीपेक्षा दूध विक्रीत १ लाख ८८ हजार लिटरची वाढ

कोल्हापूर, ता. २५ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या दुधाच्या विक्रीने आषाढी एकादशीनिमित्त यंदा नवा उच्चांक गाठला असून, गतवर्षीच्या तुलनेत १ लाख ८८ हजार लिटरांनी वाढ होऊन यंदा १७ लाख ७९ हजार लिटर दुधाची विक्रमी विक्री झाली आहे.

          आषाढी एकादशीनिमित्त वारकरी, भाविक, विविध धार्मिक कार्यक्रम, अन्नछत्रे, महाप्रसाद व सेवा उपक्रमांसाठी दही, ताक व दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. ही वाढलेली मागणी लक्षात घेऊन गोकुळने उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक आणि वितरणाचे नियोजन केले होते. विशेषतः पुणे, मुंबई आणि कोल्हापूर विभागातील वाढीव दुधाची गरज वेळेत पूर्ण करण्यात आली. गोकुळच्या शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण दुधामुळे ग्राहकांचा विश्वास सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सण-उत्सवाच्या काळातही ग्राहकांची पहिली पसंती गोकुळच्या दूधालाच मिळत असल्याचे या विक्रीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गुणवत्ता, शुद्धता आणि वेळेवर उपलब्धता या त्रिसूत्रीच्या बळावर गोकुळने वाढीव मागणीची यशस्वी पूर्तता करत विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला.

          गतवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी १५ लाख ९१ हजार लिटर दुधाची विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ८८ हजार लिटरांची वाढ होऊन विक्री १७ लाख ७९ हजार लिटरांवर पोहोचली.या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, दूध संस्था, वितरक, कर्मचारी, अधिकारी, केंद्रचालक, वाहतूक ठेकेदार आणि हितचिंतक यांचे मोलाचे योगदान आहे.

          याबाबत संघाचे डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी म्हणाले, “आषाढी एकादशीनिमित्त पुणे, मुंबई आणि कोल्हापूर विभागात दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यानुसार उत्पादनापासून वितरणापर्यंत सर्व स्तरांवर सूक्ष्म नियोजन करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना कोणताही अडथळा न येता वेळेत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण दूध उपलब्ध करून देता आले. ग्राहकांचा गोकुळवरील विश्वास आणि सर्व घटकांच्या समन्वयामुळे यंदा विक्रीचा नवा उच्चांक नोंदविता आला.”


Spread the news

You may also like

error: Content is protected !!