एका दिवसात वसूल केला तीन लाखाचा दंड

Spread the news

अल्पवयीन वाहन चालविणारे ११ चालक/पालक यांच्यावर कारवाई करून त्यांचेकडून ५५,०००/- रुपये तसेच मोटर वाहन कायद्यांचे उल्लंघन करणारे ४२१ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांचेकडून ३,२५,६५०/- इतका दंड आकारलेला आहे.

­

 

दिनांक २०.०८.२०२६ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० वा. कालावधीत शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून अल्पवयीन वाहन चालक तसेच तिब्बलसीट वाहन चालवून हुल्लडबाजी करणारे, वाहनांचे सायलेन्सर बदलून वाहन चालविणारे तसेच कर्णकर्कश हॉर्न वाजविणारे अशा वाहनधारकांवर मा. पोलीस अधीक्षक सो, मा.अपर पोलीस अधीक्षक सो व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर वतीने कोल्हापूर शहरातील महावीर कॉलेज, विवेकानंद कॉलेज, शाहाजी कॉलेज, गोखले कॉलेज, सायबर चौक, खरी कॉर्नर या ठिकाणी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना नेमून विशेष मोहिमेद्वारे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे वाहन धारकांवर खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

  •  
अ.क्रं. उल्लंघनाचा प्रकार केसेस दंड
०१ तिब्बल सीट ३१ ३१०००
०२ वाहन चालविताना मोबाईलचा वापर २७ ३६०००
०३ विहीत नमुन्यात नंबर प्लेट न ठेवणे ७७ ५२५००
०४ फॅन्सी नंबर प्लेट २०००
०५ वाहनामध्ये मॉडिफिकेशन करणे २०००
०६ लायसन्स जवळ न बाळगणे १८८ १४२०००
०७ लायसन्स न काढणे व अल्पवयीन पालकांवर कारवाई ११ ५५०००
०८ इतर केसेस १४ ६१३५०
एकूण ४३२ ३८०६५०

सदरची कारवाई मध्ये प्रिया पाटील, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, श्री. ठिकाणे, परि, पोलीस उप – अधीक्षक, नंदकुमार मोरे, पोनि, शवाशा, पोनि संतोष डोके, शाहूपुरी पो.ठाणे, पोनि श्रीराम कन्हेकर, लक्ष्मीपुरी पो. ठाणे, पोनि विकास जाधव, राजारामपुरी पो.ठाणे, पोनि किरण लोंढे, जुना राजवाडा पोलीस ठाणे तसेच पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!