८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन ‘गोकुळ’ मध्ये उत्साहात साजरा

Spread the news

८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन ‘गोकुळ’ मध्ये उत्साहात साजरा

­

 

कोल्हापूर, ता. १५ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) यांच्या वतीने ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे संघाच्या प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले आदी उपस्थित होते. यावेळी नेर्ली हायस्कूल, नेर्ली येथील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, ‘वंदे मातरम्’ तसेच समूहगीत सादर केले.

  •  

          गोकुळ प्रकल्पाबरोबरच संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे यांच्या हस्ते, डॉ. चंद्रकांत परुळेकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. तसेच लिंगनूर चिलिंग सेंटर येथे शशिकांत गायकवाड, तावरेवाडी चिलिंग सेंटर येथे सुनिल चेंडके, गोगवे चिलिंग सेंटर येथे युवराज चौगले, शिरोळ सॅटेलाईट डेअरी येथे दिलावर पखाली, महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे मानसिंग देशमुख, महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल येथे व्ही. टी. पाटील तसेच बोरवडे चिलिंग सेंटर येथे आनंदा जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संबंधित चिलिंग सेंटर वरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

          यावेळी सहा. महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (पशुसंवर्धन) डॉ. दयावर्धन कामत, व्यवस्थापक (संकलन) दत्तात्रय वाघरे, धनाजी पाटील, डॉ. प्रकाश दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, सुरक्षा अधिकारी आप्पासो शिंदे तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!