*सांगली येथे ८४ व्या क्रांतिदिनी ९ ऑगष्ट रोजी क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यासमोर धरणे आंदोलनात सहभागी व्हा.*
सांगली दि.७
देशातील लोकशाही विरोधी दमण शक्तीचा बिमोड करण्यासाठी ९ ऑगष्ट क्रांतिदिनी भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस यांच्या राष्ट्रद्रोही कारवायाना विरोध करणाऱ्या सर्व पक्ष, संघटना, युवक, युवती आणि स्वातंत्र्यप्रेमी नागरिक बंधू भगिनींनी रविवार दि. ९ ऑगष्ट २०२६ रोजी सांगली. येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पुतळ्यासमोर सकाळी १०-०० वा. होणाऱ्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्यने उपस्थित रहावे. असे आवाहन सर्व पुरोगामी पक्ष-संघटना, विद्यार्थी ,यूथ संघटनेच्यावतीने, स्वातंत्र्य संग्राम सैनिक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
आज देशभर भ्रष्टाचाराने कहर केलेला आहे.याचाच परिणाम म्हणून नीट, सेट आणि अन्य परिक्षांचे पेपर फूटीचे प्रकार खुलेआम चालू आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य उध्वस्त होते आहे. याचा बंदोबस्त करण्यापेक्षा संरक्षण देण्याची भूमिका भाजपप्रणीत सरकार करीत आहेत. हे सरकार शेतकरी-कामगार- विद्यार्थी यांचे विरुद्ध प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कायदे करून त्यांचे जगण्याचा हक्क काढून होत आहे. जनतेची सर्व बाजूने कोंडी करून लूट केली जात आहे. या आणि धर्मांध शक्तीना उघड उघड पाठिंबा देवून धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला तिलांजली दिली जाते आहे. राज्यघटनेची तोडफोड करून मनमानीपणे राज्य करणात्या प्रवृतीच्या विरुद्ध पून्हा एकदा स्वातंत्र्याची कढाई लढण्याची आवश्यकता आहे.
रविवार. ९ ऑगष्ट रोजी सकाळी १०.०० वा स्वातंत्र्यप्रेमी नागरिक बंधू भगिनी युवकांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे पुरोगामी पक्ष संघटना विद्यार्थी युवक यांचेवतीने करण्यात आले आहे.



