गोखले कॉलेजमध्ये दिल्या पार्थ पाटील यांना शुभेच्छा
कोल्हापूर दिनांक 22 गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई व पेट्रन कौन्सिल सदस्य दौलत देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पार्थ विद्यानंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
पार्थ विद्यानंद पाटील यांनी बी. इ सिव्हिलचे शिक्षण डॉ.डी. वाय. पाटील इंजिनियरिंग कॉलेज याठिकाणी केले असून मास्टर ऑफ स्ट्रॅक्चर चे शिक्षण लंडन मधील नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटी येथे पूर्ण केले असून त्यांनी थ्री डी प्रिंटिंग स्लॅब कव्हर्स या विषयातील पेटंट त्यांना मिळाले असून त्यांना पुढील शिक्षणास भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली असून त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय कार्याबद्दल युवा नेते दौलत देसाई यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. याप्रसंगी विश्वजीत विद्यानंद पाटील उपस्थित होते.